Johnson and Johnson’s Single-Dose COVID-19 Vaccine ला भारतामध्ये आज (7 ऑगस्ट) आपत्कालीन वापरासाठी (Emergency Use Authorisation) मंजुरी देण्यात आल्याची माहिती Union Health Minister Mansukh Mandaviya यांनी दिली आहे. जॉन्सन अॅन्ड जॉन्सन च्या या लसीनंतर आता भारतामध्ये पाच लसी या आपत्कालीन मंजुरी मिळवल्याने नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. यापूर्वी भारत सरकारने सीरम च्या कोविशिल्ड, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन, रशियाच्या स्फुटनिक वी आणि मॉर्डना या लसींना परवानगी दिली आहे. भारतात सध्या 50 कोटी पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे त्यामुळे या महत्त्वाच्या टप्प्यांवर अधिकाधिक लसींना परवानगी मिळाल्यास देशात लसीकरणाचा वेग सुधारेल आणि आगामी कोरोना लाटांचा प्रभाव रोखण्यास मदत होईल असा विश्वास आहे.
Johnson and Johnson’s single-dose COVID-19 vaccine बद्दल काही गोष्टी
- Johnson and Johnson लसीचं सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही सिंगल डोस व्हॅक्सिन आहे म्हणजे इतर लसींप्रमाणे याचे दोन डोस गरजेचे नाहीत.
- जॉन्सन अॅन्ड जॉन्सन ची ही व्हॅक्सिन Adenovector Vaccine आहे. म्हणजे या लसीत adeno वायरस वापरला आहे जो सामान्य सर्दी, फ्लू साठी कारणीभूत ठरतो. अॅडिनो वायरस मॉडिफाय केलेला असल्याने कोरोना वायरसचा संसर्ग झाला तरीही तो शरीरात पेशींमध्ये गेल्यानंतर पसरू शकत नसल्याने आजार बळावण्याचा धोका कमी होतो. (नक्की वाचा: Pfizer-BioNTech COVID-19 Vaccine: जाणून घ्या जगातील सर्वप्रथम मान्यता मिळालेल्या लसीबद्दल खास गोष्टी!).
- जॉन्सन अॅन्ड जॉन्सन ची लस JNJ-78436735 किंवा Ad26.COV2 म्हणून देखील ओळखली जाते. Janssen Pharmaceutica या बेल्जियम बेस असणार्या कंपनीने तिची निर्मिती केली आहे. तर अमेरिकेतील बोस्टन मधील Beth Israel Deaconess Medical Center सोबत विकसित करण्यात आली आहे.
- 18 वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जाऊ शकते.
- भारतातील इतर लसींप्रमाणेच ही लस देखील 2-8 डिग्री तापमानात फ्रिज मध्ये ठेवता येणार. 3 महिन्यांपर्यंत नॉर्मल टेंम्परेचरला राहू शकते.
- जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, गंभीर आजारपणात 85% इफेक्टिव्ह असल्याचं समोर आले आहे. तर 100% हॉस्पिटलायझेशन पासून दूर ठेवते.
- क्लिनिकल ट्रायलमध्ये या लसीची एफिकसी अर्थात प्रभावक्षमता 66.3% असल्याचं समोर आलं आहे.
- Delta (B.1.617.2), Beta (B.1.351), Gamma (P.1) या कोरोना वायरसच्या नव्या प्रजातींमध्ये ही लस प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. सिंगल डोस मध्ये देखील या लसीने शरीरात अॅन्टीबॉडीज निर्माण करून धोका कमी केला आहे.
दरम्यान अमेरिकेत जॉन्सन अॅन्ड जॉन्सन लसीमुळे काही काळ संभ्रम देखील निर्माण झाला होता. अगदी दुर्मिळ केसमध्ये या लसीमुळे अतिगंभीर ब्लड क्लॉट्स झाल्याची काही प्रकरणं समोर आली होती. त्यानंतर 13 एप्रिलला या लसीला थांबवण्यात आले होते. मात्र त्यानंतर 10 दिवसांतच ही बंदी उठवण्यात आली.