Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
ताज्या बातम्या
15 minutes ago
Live

'अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही', ट्रंप यांचा इशारा; 8 जानेवारी 2020 च्या ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Dipali Nevarekar | Jan 08, 2020 10:47 PM IST
A+
A-
08 Jan, 22:47 (IST)

इराण आणि अमेरिकाचा वाद आता शिगेला पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेन जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वादाचा ठपका इराणवर ठेवत सद्य परिस्थितीची माहिती माध्यमांना आणि जनेतला दिली. यावेळी ट्रंप म्हणाले, 'सुलेमानी यांनी दहशतवाद्यांना पाठींबा दिला, म्हणूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अमीरिकेकडे अधिक अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आहेत मात्र आम्ही त्याचा उपयोग करणार नाही. आता युरोपीयन देशांनी इराणविरोधात एकत्र यायला हवे. यासोबतच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही आणि आर्थिक निर्बध घालू' असा इशाराही त्यांनी दिला. पुढे इराणच्या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या तळाचे थोडे नुकसान झाले आहे मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

08 Jan, 19:11 (IST)

केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर करणार आहे. संसदेचे कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली आहे. 

08 Jan, 16:52 (IST)

पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 116 वा पदवीप्रदान सोहळा आज पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी CAA, NRC विरूद्ध निदर्शनं केली आहे. 

08 Jan, 15:39 (IST)

 उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या बंडखोरीमुळे भाजपा विजयाच्या दिशेने जात आहे. पुतण्या धनंजयला भाजपाच्या गोटातून उमेदवारी मिळाली. दरम्यान महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत असे वृत्त आहे.   

08 Jan, 15:07 (IST)

कोल्हापूरातील कामगारांनी पुकारलेल्या मोर्चात राजू शेट्टी यांनी देखील सहभाग घेतला आहे. कोल्हापूरात संघटना आक्रमक झाल्या असून या आंदोलनाला पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

08 Jan, 14:44 (IST)

अमेरिका-इराणमधील तणाव आता विकोपाला गेला आहे. या दोन्ही देशांचे एकमेकांवर होणारे हल्ले-प्रतिहल्ले पाहता इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. "बदला अजून पूर्ण झालेला नाही. खरा बदला अजून बाकी आहे" अशा शब्दांत त्यांनी अमेरिकेला चेतावणी दिली आहे.

08 Jan, 13:49 (IST)

JNU प्रकरणी समर्थन देणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर दीपिका हिने जेएनयूच्या विद्यार्थ्यांना दिलेले समर्थन हे चुकीचे नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

08 Jan, 12:55 (IST)

महाराष्ट्र विधीमंडळात आज बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनामध्ये  अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची मुदत पुढील दहा वर्षांसाठी वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे.

08 Jan, 12:10 (IST)

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे  मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत.   इथे पहा निकालाचे लाईव्ह अपडेट्स 

08 Jan, 11:47 (IST)

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज पहिलं अधिवेशन पार सुरू झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या एकदिवसीय अधिवेशनामध्ये मंत्रीमंडळ  विस्तारातील नव्या आमदारांची ओळख  करून दिली आहे.  

Load More

ट्रेड युनियनकडून आज 8 जानेवारी दिवशी पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' ला सुरूवात झाली आहे. सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरूद्ध पुकारण्यात आलेल्या या बंदामध्ये शेतकर्‍यांसह INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF या कामगार संघटनांचा सहभाग आहे. आजच्या भारत बंद मध्ये शेतकर्‍यांसह, बॅंकाचाही समावेश आहे. सध्या मुंबईमध्ये स्थिती सामान्य असून शाळा, कॉलेज सुरू आहे. तर वाहतूक सेवा देखील सुरळीत आहे. कामगारांचा सरकारविरूद्ध धोरणांचा एल्गार सुरू झाला असल्याने पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. Trade Unions कडून 8 जानेवारी दिवशी भारत बंद; मुंबई मध्ये BEST Bus, लोकल ट्रेन्स, रिक्षा, टॅक्सीच्या सेवांवर कसा होऊ शकतो परिणाम.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या 

महाराष्ट्रात एकीकडे आज कामगारांचा बंद सुरू असताना दुसरीकडे सहा जिल्हा परिषदांची मतमोजणी होणार आहे. नागपूर, वाशिम, पालघर सह 6 महत्त्वाच्या जिल्हा परिषदांवर कुणाचा झेंडा फडकणार हे पाहणं आज उत्सुकतेचं ठरणार आहे. विदर्भामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तर उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन या भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान आज मुंबईमध्ये विधीमंडळाचं एकदिवसीय अधिवेशनदेखील आयोजित करण्यात आलं आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बड्या उद्योजकांसोबत भेट घेऊन राज्यातून उद्योग बाहेर जाणार नाहीत याची ग्वाही दिली आहे.


Show Full Article Share Now