Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

Maharashtra ZP Election Results 2020 Highlights : पालघर, धुळे, वाशिम,अकोला, नंदुरबार, नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अंतिम निकाल, ठळक घडामोडी, घ्या जाणून

महाराष्ट्र Siddhi Shinde | Jan 08, 2020 07:14 PM IST
A+
A-
08 Jan, 19:08 (IST)

पालघर जिल्हा परिषद निकाल : एकूण ५७ जागा - शिवसेना : १८, माकपा : ५, भाजप : ११,राष्ट्रवादी : १६, काँग्रेस : १, बविआ : ४, मनसे : ० अपक्ष : २

अकोला जिल्हा परिषद निकाल: एकूण ५३ जागा - शिवसेना - ११, भारिप - १९, भाजप - ५, राष्ट्रवादी - ३, काँग्रेस - ३, अपक्ष - ४

नंदुरबार जिल्हा परिषद निकाल - ५६ जागा- काँग्रेस २३, भाजपा २३, शिवसेना ७, राष्ट्रवादी ३, अपक्ष - 00

नागपूर जिल्हा परिषद निकाल -  एकूण जागा - ५८ -  काँग्रेस - ३०, राष्ट्रवादी - १०, भाजप  - १५, शेकाप - ०१, शिवसेना - ०१, अपक्ष  - ०१

वाशिम जिल्हा परिषद - भाजप - ७, शिवसेना - ७, वंचित - ९, राष्ट्रवादी - १०, काँग्रेस - ९, अपक्ष - २, जिल्हा जनविकास आघाडी - ७, स्वाभिमानी शेतकरी - १

धुळे जिल्हा परिषद निकाल - एकूण ५५ (१ निकाल राखीव)- भाजप - ३८, काँग्रेस - ४, शिवसेना - ३, राष्ट्रवादी काँग्रेस - ०, अपक्ष - १, एका जागेचा निकाल राखुन ठेवण्यात आला आहे.

पंचायत समिती निवडणूक निकाल 

अकोला पंचायत समिती निकाल - एकूण २० जागा- भारिप - १०, शिवसेना - ४, राष्ट्रवादी - १, भाजप - ३, काँग्रेस - ०, अपक्ष - २

मूर्तिजापूर पंचायत समिती निकाल -  एकूण १४ जागाछ भारिप - ६, शिवसेना - २, राष्ट्रवादी - ३, काँग्रेस - ३

धुळे - शिंदखेडा पंचायत समिती- एकूण २० जागा- भाजप - १५, शिवसेना - २, काँग्रेस - १, राष्ट्रवादी - १, अपक्ष - १

08 Jan, 18:51 (IST)

परस्पर संमतीतून अलिखीत किंवा मूक संमतीतून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी पंचायत समिती (Wani Panchayat Samiti) सभापती, उपसभापती निवडणुकीत सीपीआय आणि भाजप यांच्यात धक्कादायक युती  घडल्याचे समजते. आश्चर्यकारक ठरलेल्या या सांकेतीक युतीत भाजपचे संजय पिंपळशेंडे सभापती तर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रज्योती शेंडे यांची उपसभापती म्हणून निवड झाल्याचे समजते आहे.

08 Jan, 18:43 (IST)

उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी केलेले बंड आज दिवसभर चर्चेत राहिले आहे. त्यामुळे स्वपक्षालाच अडचणीत आणणाऱ्या आमदार सावंत यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याबबत शिवसैनिकांमध्ये  उत्सुकता आहे.

08 Jan, 17:42 (IST)

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने दमदार विजय मिळवला आहे. इथे महाविकासआघाडी आणि अनिल गोटे यांच्या गटाचाही दारुन पराभव झाला आहे. या पराभवानंतर अनिल गोटे यांनी भाजपवर खळबळजनक आरोप करत भाजपने हा विजय अधिकाऱ्यांना पैसे चारुन मिळवला असल्याचे म्हटले आहे.

08 Jan, 16:53 (IST)

अकोला जिल्हा परिषदेतील 52 जागांपैकी कोणातच पक्ष मॅजिक फिगर न गाठू शकल्याने स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र राष्ट्रवादी 12, काँग्रेस 9, शिवसेना 6 व अन्य पक्ष जसे जनविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष एकत्र येऊन 18 जागा सरकार स्थापण्याची शक्यता अधिक आहे. भाजपला मात्र वाशिम मध्ये केवळ 7 जागी विजय मिळवता आला आहे.

 

08 Jan, 16:36 (IST)

अकोला जिल्हा परिषदेतील 53 जागांपैकी 21 जागी विजयी मिळवत वंचित बहुजन आघाडीने विजयाकडे वाटचाल सुरु केलेली आहे. 

08 Jan, 16:09 (IST)

नागपूर जिल्हा परिषद निकालात भाजपची होम ग्राउंडवर झालेली पीछेहाट पाहता कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला जनतेची पसंती मिळत आहे असे विधान केले आहे.  नागपूर मध्ये सध्या काँग्रेसकडे 31 राष्ट्रवादी काँग्रेस कडे 10 तर शिवसेनेकडे 1 जागीचा विजय आहे. भाजपला मात्र 14 जागांवर विजय मिळवून समाधान मानावे लागले आहे. अजून 53 पैकी 16 जागांचे निकाल येणे बाकी आहे. 

08 Jan, 15:16 (IST)

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 जागांचा निकाल हाती आला असून कोणत्याही पक्षाला बहुमत प्राप्त झालेले नाही. भाजप आणि काँग्रेस पक्षाला प्रत्येकी 23 जागांवर विजय प्राप्त झाला आहे तर शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी 3 जागी जिंकलेली आहे. महाविकास आघाडीला याठिकाणी बहुमत असले तरी सत्तास्थापनेसाठी एकत्र येण्याबाबत तिन्ही पक्षांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. 

08 Jan, 14:56 (IST)

पालघर जिल्हा परिषदेमध्ये 57 जागा आहेत. त्यापैकी सर्वाधिक 18 जागा शिवसेना पक्षाने जिंकल्या आहेत.  

08 Jan, 14:33 (IST)

नागपूरमध्ये भाजप दिग्गजांच्या मतदारसंघात पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालानंतर एनसीपी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना हा निकाल म्हणजे आता 'हवा बदल रही है' असं म्हणत भाजपची खिल्ली उडवली आहे. 58 जागांपैकी भाजपाला 09 तर महाविकासआघाडीला 25 जागा मिळाल्या आहेत. Nagpur ZP Election Results 2020: नागपूर जिल्हा परिषदेमध्ये नितीन गडकरी,चंद्रशेखर बावनकुळे या भाजपा दिग्गजांना धक्का; काँग्रेस उमेदवार विजयी

 

 
Load More

Maharashtra ZP Election Results 2020 Live: महाराष्ट्रात नागपूर (Nagpur), पालघर (Palghar), धुळे (Dhule) , वाशिम (Washim) सह 6 जिल्हा परिषद निवडणुकांच्या (ZP Elections) मतमोजणीला आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे, यातील काही ठिकाणची निकाल आता हळूहळू हाती येऊ लागले आहेत. या निवडणूकांमध्ये नागपूर मध्ये विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उत्तर महाराष्ट्रात गिरिश महाजन (Girish Mahajan) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांसाठी काल मतदान पार पडले होते. विधानसभेप्रमाणेच आता जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना (Shivsena) , कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ही महाविकास आघाडी एकत्र लढली आहे.

ZP Election Results 2020: नागपूर, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम जिल्हा परिषद निवडणूक मतमोजणीला सुरूवात

प्राप्त माहितीनुसार, पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार आहेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. सोबत 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान पार पडले. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 359 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागा, तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांवरील निकाल आज जाहीर केले जाणार आहेत. धुळे जिल्हा परिषदेमध्ये 51 गटांसाठी 216 उमेदवार, तर 110 गणांसाठी 397 उमेदवार रिंगणात आहेत.

यंदा जिल्हा परिषदेमध्येही महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशी चुरशीची लढत रंगणार आहे. या लढतीच्या निकालाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स लेटेस्टली मराठी वर पहा..


Show Full Article Share Now