Trade Unions कडून 8 जानेवारी दिवशी भारत बंद; मुंबई मध्ये BEST Bus, लोकल ट्रेन्स, रिक्षा, टॅक्सीच्या सेवांवर कसा होऊ शकतो परिणाम
BEST Bus| File Image | (Photo Credits: Twitter)

Bharat Bandh 2020 on January 8: मुंबईसह देशभरात 8 जानेवारी दिवशी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान त्याचा परिणाम समान्यांच्या जनजीवनावर होण्याची शक्यता आहे. मुंबईसह देशातील वाहतूक व्यवस्था देखील या काळात बाधित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान उद्याच्या देशव्यापी बंदामध्ये 10 ट्रेड युनियन्स सहभाग घेणार आहेत. याचा परिणाम मुंबईसह देशातील ट्रेन, बस, ऑटो रिक्षा यांच्यावर होणार आहे. प्रामुख्याने मेट्रो शहरामध्ये भारत बंदाचा परिणाम जाणवणार आहे. Bharat Bandh 2020: भारत बंद संपात राज्य शासकीय कर्मचारी सहभागी झाल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई; महाराष्ट्र सरकारचा इशारा.  

ट्रेड युनियन्सने केलेल्या दाव्यानुसार, उद्याच्या भारत बंद मध्ये 25 कोटी लोकं सहभागी होण्याची शक्यता आहे. सरकारच्या "anti-people" धोरणांविरूद्ध हा बंद पुकारला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे टॅक्सी, रिक्षा यांच्या सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात ओला, उबर नियमित सुरू राहणार आहे. तर या काळात विमानसेवा देखील सुरळीत राहणार आहेत. आपत्कालीन सेवा या भारत बंदच्या काळात सुरू राहणार आहेत.

मुंबईमध्ये 25 लाख प्रवासी सुमारे 3000 बेस्टच्या माध्यमातून प्रवास करतात. तसेच मुंबई लोकलमधूनदेखील लाखो प्रवासी नियमित प्रवास करतात. जर उद्या या सार्‍या सेवांना फटका बसल्यास अनेक मुंबईकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. दर ओला, उबरचे भाव देखील या काळ वधारू शकतात.

INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, सारख्या ट्रेड युनियन या काळात बंदामध्ये सहभागी राहणार आहेत. या आंदोलनामध्ये लाखो कर्मचारी सहभागी होणार आहेत. सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच शिक्षक आणि इतर क्षेत्रातील