जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये ही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. परिसरात शोधमोहीम सुरू होती. रविवारी, एका सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) आणि दहशतवादी गटांच्या प्रमुखांनी शस्त्रे आणि संदेश वाहून नेण्यासाठी महिला आणि अल्पवयीन मुलांचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. यानंतर त्यांच्या या कारवाया थांबवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न हे भारतीय सुरक्षा दलाकडून करण्यात येत आहे. (हेही वाचा - Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रवादळ आक्रमक रुपात; 7,500 नागरिकांना सुरक्षीत स्थळी हालवले, 67 रेल्वेगाड्याही रद्द)
श्रीनगर स्थित 15 कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग, ज्याला चिनार कॉर्प्स म्हणूनही ओळखले जाते, लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंग औजला यांनी देखील सांगितले की, नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलीकडे बसलेले लोक षडयंत्रात व्यस्त आहेत आणि शांत वातावरण बिघडवण्याची योजना आखत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह एका घाटातून काढण्यात आला.
या घटनेनंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील सर्व शाळा बंद केल्या आहेत.