Chandrayaan-2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, वैज्ञानिकांसाठी महत्वाचा दिवस
Chandrayaan-2 (Photo Credits-ANI)

चंद्रयान 2 (Chandrayaan-2 ) ही भारताची महत्वाकांक्षी मोहिम आता यशाच्या वाटेवर सुरु झाली आहे. तर आज (20 ऑगस्ट) चांद्रयान 2 ने  चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी आजचा दिवस फार महत्वाचा असणार आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणार आहे.  तर 7 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान 2 च लॅंन्डिंग पाहण्यासाठी इस्रोमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी असे सांगितले की, चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना कठीण स्थिती निर्माण होईल. कारण चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती 6500 किमी पर्यंत असते. त्यामुळे चंद्रयान 2 ची गती करण्यात येणार आहे. नाहीतर चांद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्रयान 2 त्याचाकडे आकर्षिले जाऊन त्यांच्यामध्ये टक्कर होण्याची शक्यता आहे. गति कमी करण्यासाठी चांद्रयान 2 ची ऑनबोर्ड प्रोपल्शन सिस्टिम थोड्यावेळासाठी सुरु करण्यात केली जाईल. दरम्यान एक छोटी चुकसुद्धा यानाला अनियंत्रित करु शकते.(Chandrayaan 2 Mission: 13 भारतीय पेलोड आणि 'नासा'च्या एका उपकरणासह चंद्रयान 2 मिशन अवकाशात झेपावणार, ISRO ची माहिती)

ANI ट्वीट:

चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर 31 ऑगस्ट पर्यंत चंद्रा भोवती गोलगोल फिरत राहणार आहे. त्यावेळी पुन्हा एकदा कक्षेत बदल केला जाईल. चांद्रयान 2 चंद्राच्या सर्वात जवळच्या कक्षेत पोहचण्यासाठी चार कक्षा बदलाव्या लागणार आहेत. तसेच चांद्रयान 2 लॅन्डर विक्रम आणि रोवर प्रज्ञान चंद्राच्या भुमीवर उतरुन प्रयोग करणार आहे. मात्र ऑर्बिटर वर्षभर चंद्राभोवती फेऱ्या घालत रिसर्च करणार आहे.