Chandrayaan 2 (Photo Credits: PIB)

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान 2 (Chandrayaan 2) मोहिमेमध्ये आता नासाची मदत होणार आहे. चंद्रयान 2 मध्ये 13 पेलोडचा वापर करणार असून त्यामध्ये नासाच्या (NASA)  एका प्रयोगाचा समावेश असणार आहे असे इस्त्रोकडून (ISRO) सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता चंद्रयान मोहिमेमध्ये 13 पेलोड आणि 8 ऑर्बिट, 3 लॅन्डर आणि दोन रोव्हर असतील. Chandrayan 2: 9-16 जुलै दरम्यान होणार 'चंद्रयान 2' चं प्रक्षेपण, ISRO ची माहिती

यंदा चंद्रयान 2 जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अवकाशात उड्डण करणार आहे. तर 6 सप्टेंबर दिवशी ते चंद्रावर उतरणार आहे. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे.