Chandrayan 2:  9-16 जुलै दरम्यान होणार 'चांद्रयान 2' चं प्रक्षेपण, ISRO ची माहिती
Chandrayaan 2 (Photo Credits: Twitter/ ISRO)

Chandrayaan 2 launch Date: भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम 'चांद्रयान 2' (Chandrayan 2) ची घोषणा करण्यात आली आहे. इस्त्रोने (ISRO) दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 2 चे प्रक्षेपण 9-16 जुलैच्या दरम्यान होणार आहे. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे. 6 सप्टेंबर 2019 पर्यंत हे चांद्रयान चंद्रावर पोहचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इस्त्रो ट्विट 

कसं आहे चांद्रयान 2?

  • चांद्रयानामध्ये ऑरबिटर (Orbiter),लॅन्डर ( Lander Vikram), रोव्हर (Rover Pragyan)चा समावेश आहे.
  • चांद्रयान 2 चे वजन सउमारे 3290 किलो आहे.
  • चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश झाल्यानंतर ऑर्बिटर लॅन्डरपासून वेगळा होणार आहे.
  • लॅन्डर चंद्रावर पोहचल्यानंतर रोवर वेगळा होणार आहे.
  • ऑर्बिटर आणि रोवरमध्ये आत्याधुनिक उपकरणांचा समावेश असणार आहे.

चांद्रयान 2 दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मिळणारे मिनरल्स आणि इतर पदार्थांचा अभ्यास करणार आहेत. यापूर्वी दोनदा चांद्रयानाचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले आहे.