Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

सध्या संपूर्ण देशामध्ये कोविड-19 लसीकरण (Covid-19 Vaccination) मोठ्या प्रमाणावर चालले आहे. देशामध्ये 100 कोटी लोकांचे लसीकरण करणे हा आपला प्राथमिक टप्पा असून सध्या देशातील नागरिकांना बुस्टर डोस (Booster Dose) देण्याचा आरोग्य मंत्रालयाची कोणतीही योजना नाही, अशी माहिती नीती आयोगाचे डॉ. व्ही. के पॉल (Dr. of the Policy Commission. V. K. Paul) यांनी दिली. तसंच कोविड-19 लसीचा तिसरा डोस देण्याची गरज आहे की नाही, यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organization) कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

देशामध्ये सर्व लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या लसींचे उत्पादन वेगाने करत असून देशातील सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण देखील होत आहे. लसींच्या उत्पादनांचा वेग पाहता पुढच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात इतर देशांचे लस पाठवू शकू, असेही ते म्हणाले. जगातील 15 वेगवेगळ्या देशांनी ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये इज्राईल, फ्रान्स, इटली आणि जर्मनी यांसारख्या देशांचा समावेश आहे. सध्या आपल्याला बुस्टर डोसबद्दल WHO कडून कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे आपण केवळ देशातील लसीकरण पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत करत आहोत.

येत्या काही दिवसांतच देशामध्ये 100 कोटी लसींचे डोस यशस्वीरीत्या देऊन होतील. यापैकी 30 टक्के लोकांचे दोन्ही डोस तर 75 टक्के लोकांचे सिंगल डोस झालेला असेल. भारत हा जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणार देश आहे. देशातील नागरिकांचे लसीकरण यशस्वी होण्याच्या दृष्टीने भारताने लसींचे इतर देशांना होणारे वितरण थांबवले आहे. (COVID19 Vaccine च्या दुसऱ्या डोसवेळी वेगळीच लस दिल्यास काय होईल? आरोग्य मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण)

दरम्यान, आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देशभरात 96.78 कोटी लसींचे डोस दिले गेले असून आज दिवसभरामध्ये 32 लाखांहून अधिक लसींचे डोस दिले गेले आहेत.