पश्चिम बंगालमधील (West Bengal) लोक तसेच भारतीयांसाठी बुधवारी मोठी बातमी समोर आली. संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक संस्था UNESCO ने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधिक यादीत (Intangible Heritage List) बंगालच्या दुर्गापूजेचा (Durga Puja) समावेश करण्याची घोषणा केली आहे. बंगालमधील दुर्गा पूजेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे व अजूनही मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो. दुर्गा पूजा हा बंगालच्या संस्कृतीशी संबंधित फार महत्वाचा घटक आहे. बंगाल सरकारने दुर्गापूजेला हेरिटेज दर्जा देण्याची विनंती युनेस्कोकडे केली होती. युनेस्कोने त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे बंगालच्या दुर्गापूजेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत फ्रान्समधील पॅरिस येथे होत असलेल्या आंतर-सरकारी समितीच्या 16 व्या सत्रात कोलकाता येथील दुर्गापूजेचा समावेश युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीमध्ये करण्यात आला. कोलकात्याच्या दुर्गापूजेचा UNESCO वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले की, ‘भारतीयांसाठी ही खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे! दुर्गापूजा आपली सर्वोत्तम परंपरा आणि लोकाचाराचे उदाहरण देते आणि कोलकात्याची दुर्गा पूजा हा प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे असा सोहळा आहे.’ (हेही वाचा: Prime Minister Narendra Modi यांनी वाराणसी मध्ये कालभैरव मंदिरात मध्ये केली आरती)
🔴 BREAKING
Durga Puja in Kolkata has just been inscribed on the #IntangibleHeritage list.
Congratulations #India 🇮🇳! 👏
ℹ️https://t.co/gkiPLq3P0F #LivingHeritage pic.twitter.com/pdQdcf33kT
— UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳😷 (@UNESCO) December 15, 2021
Overjoyed that ‘Durga Puja in Kolkata’ joins the @UNESCO Representative List of Intangible Cultural Heritage of Humanity. Many congratulations! It is a confluence of the rich heritage and culture of the county’s art, crafts, rituals and practices. Jai Maa Durga! #AmritMahotsav pic.twitter.com/I7yB5pCVfd
— Ministry of Culture (@MinOfCultureGoI) December 15, 2021
अमूर्त वारसा यादीत समाविष्ट असलेल्या भारतामधील इतर बाबी -
- वैदिक मंत्रोच्चाराची परंपरा
- रामलीला
- कुटियाट्टम (संस्कृत नाट्य)
- राममन (हिमालयातील धार्मिक उत्सव)
- मुदियेट्टू (नाटक-केरळ)
- राजस्थानची कालबेलिया लोकगीते आणि नृत्य
- छाऊ नृत्य
- लडाखचा बौद्ध जप (जम्मू आणि काश्मीरच्या ट्रान्स-हिमालय लडाख प्रदेशात पवित्र बौद्ध ग्रंथांचे पठण)
- मणिपूरचे संकीर्तन, विधी गायन, ढोलकी आणि नृत्य
- पंजाबमधील जंदियाला गुरु येथील पारंपारिक पितळ आणि तांब्यापासून भांडी बनवण्याची कला
- योग
- नवरोझ
- कुंभमेळा
UNESCO च्या 2003 मध्ये अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत कोलकात्याच्या दुर्गापूजेला समाविष्ट करण्यासाठीच्या नामांकनाला अनेक राज्य पक्षांनी पाठिंबा दिला होता. आता 2021 मध्ये दुर्गापुजेला हा मान मिळाला.