COVID-19 Update: JN.1 सबव्हेरियंटबद्दल चिंता नको; INSACOG प्रमुखांकडून दिलासा
प्रतिकात्मक फोटो (PC - PTI)

JN.1 variant in India: भारतामध्ये सोमवार (18 डिसेंबर) पर्यंत सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 1,828 इतकी नोंदवली गेली आहे. केरळमध्ये (Kerala) एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच, जेएन वन (JN.1) विषाणूचा सबव्हेरीएंटही (COVID Subvariant) आढळून आला आहे. असे असले तरी चिंता करण्याचे किंवा घाबरण्याचे मुळीच कारण नाही, असे दिलासा देणारे उद्गार INSACOG चे प्रमुख डॉ. एन.के. अरोरा यांनी काढले आहेत. अरोरा सांगतात की, कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू विशिष्ट परिस्थितीमध्ये झाला आहे. त्यामुळे नव्या व्हेरीएंटने घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घेण्याची जरुर आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

'घाबरण्याचे कारण नाही'

एन के आरोरा यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, केरळ राज्यात कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाला असला तरी त्या रुग्णाची स्थिती वेगळी होती. सदर रुग्णास मृत हृदय, फुफ्फुस आणि किडनीच्या आजारांसारखे गंभीर आजार होते. मृत्यूचे प्राथमिक कारण केवळ JN.1 सबव्हेरियंटलाच नाही तर त्याला संसर्गापूर्वी असलेल्या व्याधीही होत्या. केरळमध्ये सबव्हेरीएंट आढळून आला असला तरी, इतर राज्यांमध्ये घाबरण्याचे कारण नाही. या राज्यांमध्ये नवीन व्हेरीएंट आणि जुन्या व्हेरीएंटच्याही नमुन्यांची संख्या कमी आहे. सर्व व्हेरीएंटचे नमुने वेगवेगळ्या राज्यांतून जमा केले जात आहेत, असेही अरोरा म्हणाले. (हेही वाचा, Modi Government Covid Advisory: भारतात आढळला JN.1 विषाणूचा पहिला रुग्ण,कोविड-19 रुग्णांध्येही वाढ; केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी)

 सबव्हेरीएंटवर  INSACOG द्वारे बारीक नजर

दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक (डीजी) डॉ. राजीव बहल यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कोविड-19 चे जेएन.1 सबव्हेरिअंटचे प्रकरण आढळून आले आहे. या सबव्हेरीएंटवर केरळमध्ये INSACOG द्वारे चालू असलेल्या नियमित संशोधनात बारीक लक्ष ठवले जात आहे. हा व्हेरीएमट केरळमधील काराकुलम, तिरुवनंतपुरम, 8 डिसेंबर 2023 रोजी आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह नमुन्यात आढळला. 18 नोव्हेंबर 2023 रोजी या नमुन्याची आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. (हेही वाचा, Karnataka’s Mask Advisory: कोरोना रिटर्न्स!! केरळमध्ये कोरोना प्रकरणे वाढल्याने कर्नाटकात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आला मास्क लावण्याचा सल्ला)

जेएन.1 व्हेरीएंट ज्या रुग्णाच्या आरटी-पीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आला त्या रुग्णाला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची सौम्य लक्षणे होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालय केरळ राज्याच्या आरोग्य विभागाच्या नियमित संपर्कात आहे आणि प्रवेशाच्या विविध ठिकाणांवर लक्ष ठेवते. (हेही वाचा - New COVID Variant In India: चीन आणि अमेरिकेनंतर आता भारतात आढळला कोरोनाचा नवीन JN.1 सबवेरियंट; काय आहेत लक्षण? जाणून घ्या)

दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चे रुग्ण वाढल्याचे आणि जे एन वन (JN.1) नावाच्या नव्या विषाणूचा प्रकार आढलून आल्याचे पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सुधांशू पंत यांच्यादावारे केंद्राने राज्यांना पाठवलेल्या पत्रात राज्यांनी संभाव्य धोका विचारात घेता करावयाच्या उपाययोजना आणि सावधगिरी यांबाबत मार्गदर्शक सूचना (Modi Government Covid Advisory) केल्या आहेत. या पत्रात प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्याच्या बदलत्या परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रमुख धोरणे आणि शिफारशींची रूपरेषा देण्यात आली आहे.