शहर, गाव, खेडे, वाडी वस्ती ते शाळा, हॉटेल, ढाबे आणि चहाची टपरी आणि लहान बाळ ते तरुण आणि वृद्धांपर्यंत परिचित असलेली बिस्किट कंपनी पारले जी (Parle G Biscuit) सध्या आर्थिक अडचणीत आहे. बदलत्या काळात ग्राहकांची संख्या घटल्याने कंपनी तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उपभोक्ता (Consumption) संख्येत घट झाल्याने पारले प्रॉडक्ट्स (Parle Products) 8,000-10,000 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. दरम्यान, इंग्रजी वृत्तपत्र इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कंपनीने सरकारकडे मागणी केली आहे की, 100 रुपये प्रति किलो किंवा त्याहीपेक्षा कमी कमितीच्या बिस्किटांवरील वस्तू सेवा कर (GST) कमी करण्यात यावा. सरकारने जर ही मागणी मान्य केली नाही तर, आम्हाला (Parle Products) 8,000-10,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. कारण, विक्री घटल्याने कंपनीला प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
विशेष म्हणजे, पारले जी बिस्कीट आजही प्रति पाकीट 5 रुपये दराने विकले जाते. पारले प्रोडक्ट्सचटी विक्री 10,000 कोटी रुपयांहून अधिक होते. देशभरात कंपनीचे सुमारे 10 प्लांट आहेत. यात सुमारे 1 लाख कर्मचारी काम करतात. सोबतच कंपनीचे धर्ड पार्टी मॅनिफॅक्चरींग यूनिट्सही आहेत. या यूनिट्सची संख्या 125 इतकी आहे. कंपनीचे अर्ध्याहून अधिक उत्पन्न हे ग्रामीण भागातून येते.
काय आहे प्रकरण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, GST लागू होण्यापूर्वी प्रति किलो 100 रुपयेपेक्षा कमी किमतीच्या बिस्कीटांवर 12 टक्के कर लागत होता. त्यामुळे कंपनीला आशा होती की, GST लाहू झाल्यानंतर करांचे दर हे 5 टक्क्यांपर्यंत खाली येतील. परंतू, सरकारने GST लागू केल्यावर सर्व बिस्किटांना 18 टक्के GST स्लॅबमध्ये टाकले. (हेही वाचा, कुणी नोकरी देतं का नोकरी? आर्थिक मंदी नोकरीच्या मुळावर; Automobile सेक्टरसह अनेक क्षेत्रात नोकरभरती मंदावली)
GST प्रणालीत करवाढ झाल्यामुले कंपनीचे उत्पादनशुल्कही वाढले. परिणामी उत्पादनाची दरवाढ करणे हा एकमेव पर्याय कंपनीसमोर राहिला. मात्र, त्याचा कंपनीच्या उत्पादन विक्रिवर नकारात्मक परिणाम झाला. पारलेने आपल्या उत्पादनाची किंमत 5% वाढवली. मात्र विक्रीत घट कायम राहिली.
दरम्यान एफएमसीजी सेक्टर्समध्ये मागणी घटल्याने गेल्या महिन्यातच मार्केट रिसर्चर कंपनी नीलसनने देशातील FMCG सेक्टरमधील स्थितीबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यात यंदा कंपन्यांच्या उत्पन्न वाढीचा टक्का घटत असल्याचे म्हटले आहे.