भारतात प्रतिदिनी Smartphone वर वेळ घालवण्याचे प्रमाण 25 टक्क्यांनी वाढले- रिपोर्ट
iPhone | (Photo Credits: PixaBay)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळात भारतात स्मार्टफोनवर प्रतिदिनी वेळ घालवण्याचे प्रमाण 25 टक्क्यांनी वाढले आहे. हा दावा सोमवारी एका अभ्यासातून करण्यात आला आहे. स्मार्टफोन ब्रॅन्ड विवो (Vivo) यांच्याकडून करण्यात आलेल्या अभ्यासानुसार,  66 टक्के भारतीयांचे असे म्हणणे आहे की, स्मार्टफोन त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाच्या घटकांपैकी एक आहे. जवळजवळ 70 टक्के भारतीयांना असे वाटते की, त्यांच्या द्वारे स्मार्टफोनचा वाढता वापर हा मानसिक/शारिरीक आरोग्यावर परिणामकारक ठरू शकतो.

विवो इंडियाचे ब्रॅन्ड स्ट्रेटेजी डायरेक्टर निपुन मार्या यांनी असे म्हटले की, महारोगाच्या काळात सामाजिक स्वरुपात दूर राहण्यासाठी स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर केला गेला असून ही आता एक सामान्य गोष्ट बनली आहे. घरातून काम करणे असो किंवा अभ्यासाह नातेवाईकांसोबत संपर्कात राहण्यासाठी मोबाईल फोनचा वापर दैनंदिन जीवनात फार वाढला आहे.(Year Ender 2020: भारतीय बाजारात 2020 वर्षात धुमाकूळ घातलेले 'हे' होते सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्स)

अभ्यासात 74 टक्के सहभागी झालेल्या व्यक्तींनी असे म्हटले की, वेळोवेळी आपला मोबाईल फोन स्विच ऑफ केल्यास त्यांना परिवारासोबत अधिक वेळ घालवता येईस. परंतु 18 टक्के युजर्सने वास्तविक स्वरुपात आपला फोन स्विच ऑफ करतात. स्मार्टफोन आणि मानवीय नात्यावर त्याचे परिणाम 2020 नावाच्या अभ्यासानुसार, भारतात एप्रिल 2020 मध्ये झालेल्या लॉकडाऊनच्या काळात लोकांनी स्मार्टफोनवर ओटीटी (59 टक्के), सोशल मीडिया (55 टक्के) आणि गेमिंग (45 टक्के) साठी आपला अधिक वेळ घालवला आहे.(EPOS कंपनीने भारतात लाँच केली ADAPT प्रीमियम हेडफोन्सची सीरिज, वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल हैराण)

तसेच 79 टक्के युजर्सने मान्य केले की, स्मार्टफोन आपल्या प्रियजनांसोबत कनेक्ट राहण्यास मदत करोत. दरम्यान, स्मार्टफोन हा अत्यावश्यक कामासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र सध्याच्या घडीला त्याचा सर्वाधिक वापर हा मनुष्याच्या आयुष्यावर परिणाम करत आहे. अभ्यासात असे ही समोर आले की, 46 टक्के लोक अन्य लोकांसह एक तास जर बोलत असतील तर त्या कालावधीत जवळजव 5 फोन कॉल्स ते उचलतात. हा अभ्यास 15-45 वयोगटातील 2 हजार लोकांसंदर्भात करण्यात आला होता.