Representational Image (Photo Credits: Flickr) .. Read more at: https://www.latestly.com/india/news/chinese-companys-contract-cancelled-by-dfccil-an-indian-railways-psu-citing-poor-progress-1831059.html

भारतीय रेल्वेने (Indian Railway) चिनी कंपनीला दिलेले 471 कोटी रुपयांचे कंत्राट मागे घेतले आहेत. कानपूर आणि मुगलसराय या 417 किमी लांबीच्या विभागातील, सिग्नल आणि टेलीकम्युनिकेशनचे काम या चिनी कंपनीकडे सोपविण्यात आले होते. रेल्वेच्या वतीने, 2016 मध्ये, बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाइन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल अँड कम्युनिकेशन ग्रुपला (Beijing National Railway Research and Design Institute of Signal and Communication Group Co. Ltd) हे काम सोपविण्यात आले होते.मात्र हे काम संथगतीने चालू असल्याने कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत, रेल्वेने निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने म्हटले आहे की, 4 वर्षांच्या कालावधीत केवळ 20% काम चीनी कंपनीने केले आहे.

एएनआय ट्वीट -

LOC बाबत चीनबरोबर सुरू असलेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला नसल्याचे रेल्वेने म्हटले आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (DFCCIL) या रेल्वे कंपनीने चिनी कंपनीला दिलेला कंत्राट मागे घेतले आहे. चीनी कंपनीकडून करार मागे घेण्याबाबत सविस्तर माहिती देताना, रेल्वेने सांगितले की 4 वर्षात केवळ 20% काम झाले आहे. याखेरीज, कंपनी करारातील भाग असतानाही तांत्रिक कागदपत्रे शेअर करणे टाळत होती. यासोबतच स्थानिक संस्थांशी समन्वय नसल्यामुळे कामदेखील विस्कळीत झाले होते. इतकेच नव्हे तर बर्‍याच बैठकांनंतरही प्रगती खूपच हळू चालली होती, अशी कारणे देत हे कंत्राट मागे घेतले आहे. (हेही वाचा: मुकेश अंबानी यांच्या जिओमध्ये 9 आठवड्यात अकरावी गुंतवणूक; सौदी अरेबियाच्या 'पीआयएफ'ने 11,367 कोटींमध्ये विकत घेतली 2.32 टक्के भागीदारी)

डीएफसीसीआयएल एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कॉर्पोरेशन आहे जे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाद्वारे चालवले जाते. डीएफसीसीआयएलचे मुख्य उद्दीष्ट, फ्रेट कॉरिडॉरचे नियोजन, विकास आणि आर्थिक संसाधने एकत्रित करणे आणि बांधकाम आणि देखभाल करणे हे आहे.