Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

देशात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे रेल्वेच्या ट्रेन चालवण्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी असे म्हटले की, आतापर्यंत कोणत्याही राज्यात ट्रेन सेवा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच कोरोनाच्या परिस्थिती बद्दल बोलायचे झाल्यास त्या संदर्भात सर्व सावधगिरी रेल्वेकडून बाळगली जात आहे. त्याचसोबत प्रवाशांची तपासणी सुद्धा केली जात आहे. ऐवढेच नाही तर प्रवासी त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहचल्यावर ही त्यांची तपासणी केली जात आहे.(Oxygen Plant Under PM-CARES Fund: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पीएम केयर्स फंडमधून 100 नवीन रुग्णालयांमध्ये उभारण्यात येणार ऑक्सिजन प्लांट)

सुनील शर्मा यांनी संवाददात्यांना असे ही म्हटले की, रेल्वेच्या मते आयआरसीटीसी येथे तिकिट बुकिंग करणाऱ्या वेबसाइटवक दिल्या गेलेल्या प्रोटोकॉलचे पालन सर्व राज्यांकडून केले जात आहे. त्याचसोबत वेबसाइटवर असे ही सांगण्यात आले आहे की, कोणत्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुम्हाला आरटी-पीसीआर चाचणी किंवा कोरोनाचे रिपोर्ट्स घेऊन जाणे अनिवार्य आहे. तसेच कोणत्या ठिकाणी कोरोनाच्या तपासाची प्रक्रिया केली जात आहे हे सुद्धा वेबसाइटवर सांगण्यात आले आहे.

सध्या ट्रेन बंद करण्याबद्दल सर्व राज्यांनी अपील केले नाही. ज्या ठिकाणी कोरोनाच्या परिस्थितीची चिंता व्यक्त केली जात आहे त्या संदर्भात रेल्वेसोबत चर्चा केली जात आहे. रेल्वेकडून असे सांगण्यात आले आहे की, जेथे निषिद्ध क्षेत्र आहे तेथे रँडम तपासणी केली जात आहे. रेल्वेने ई-तिकिट बुकिंग करण्यापूर्वी वेबसाइटवर सर्व माहिती उपलब्ध करुन दिली आहे. प्रवाशांना ही सांगितले जात आहे की, कोरोनाची चाचणी करणे किंवा त्याचे रिपोर्ट्स सोबत घेऊन जाणे.(Central Railway Summer Special Trains: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई पुण्याहून चालवणार 154 उन्हाळी विशेष गाड्या)

तर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुद्धा केली जात आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष शर्मा यांनी श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्याच्या शक्यतेला नकार दिला आहे. त्यांनी म्हटले की, मागणी आणि गरजेनुसार ही त्या ट्रेन चालवल्या जातील. गर्दी थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या तिकिटांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे.