'विक्रम लँडर'चा शोध लावण्यात भारतीय अभियंत्याचे मोठे योगदान; पहा नक्की कसा शोधून काढला Vikram lander
Shanmuga Subramanian (संग्रहित संपादित प्रतिमा)

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) चंद्रयान -2 (Chandraayan 2) चा विक्रम लँडर (Vikram lander) शोधला आहे. नासाने याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे. नासाच्या ल्युनार रेकनोनेस ऑर्बिटरला (एआरओ) ला चंद्रयान-2 चा विक्रम लँडर, चंद्राच्या पृष्ठभागावर सापडला आहे. नासाने त्याचा फोटोही सार्वजनिक केला आहे. 7 सप्टेंबर रोजी ठरलेल्या वेळेच्या थोडे आधी विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. आता विक्रमला शोधण्यात चेन्नईचा अभियंता शानमुगा सुब्रमण्यम (Shanmuga Subramanian) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शानमुगा यांनी कठोर परिश्रम घेऊन संपर्क तुटलेल्या चंद्रयान-2 च्या विक्रम लँडरचे कोसळलेले अवशेष शोधले आहेत.

विक्रमचा ठावठिकाणा लावल्यावर शानमुगाने नासाला याची माहिती दिली आणि त्यानंतर नासानेही याची पुष्टी केली. या सहकार्याबद्दल नासाने शानमुगाचे आभार मानत त्यांचे कौतुकही केले आहे.

असा लागला विक्रमचा शोध -

काही दिवसांपूर्वी नासाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची छायाचित्रे पब्लिश केली होती. जगातल्या इतर लोकांप्रमाणेच शानमुगा यांनीही हे फोटो डाउनलोड केले, व त्यांवर आपला रिसर्च सुरु केला. या फोटोमध्ये दिसत असलेल्या गोष्टींनुसार विक्रम नक्की कुठे असेल याच्या असंख्य शक्यतांचा त्यांनी विचार केला. अखेर उत्तर मिळाले. चंद्रावर उतरताना विक्रमचा वेग कमी न झाल्याने तो चंद्रावर अपक्षेप्रमाणे उतरू शकला नव्हता. त्यामुळे तो कदाचित चंद्रावरील मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्याता आहे असे शानमुगा यांना वाटले. त्यानुसार त्यांनी ट्विट करत नासाला ही माहिती दिली. अहो आश्चर्यम! नासाने जेव्हा शोध सुरु केला तेव्हा अगदी त्याच ठिकाणी विक्रमचा शोध लाहाला. (हेही वाचा: 'चांद्रयान-2' च्या विक्रम लँडरला शोधले, नासाकडून छायाचित्र जारी)

कोण आहेत शानमुगा सुब्रमण्यम -

33 वर्षीय शानमुगा एक मेकॅनिकल इंजिनियर आणि कॉम्पुटर प्रोग्रामर आहे. सध्या ते चेन्नईमधील लेनोक्स इंडिया टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये, टेक्निकल आर्किटेक्ट म्हणून कार्यरत आहेत. 7 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या विकर लँडरच्या चंद्रावरील हार्ड लँडिंगच्या या नव्या पैलूचा शोध घेण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.