Representational Image | Economy (Photo Credits: PTI)

देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घालायला सुरुवात झाल्यानंतर लॉक डाऊन लागू करण्यात आले होते. आता देशात अनेक गोष्टींमध्ये बऱ्यापैकी शिथिलता आणली गेली आहे. लॉकडाउन समाप्त झाल्यानंतर भारतामध्ये आर्थिक हालचालींना वेग आला आहे. मागणी वाढल्याने पुरवठा वाढला आहे त्यामुळे अनेक क्षेत्रात कमाईदेखील वाढली आहे. यादरम्यान रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody's) बुधवारी सांगितले की, परिथिती अशीच राहिली तर, पुढील वर्षी भारतीय कंपन्यांसाठी चांगला काळ असू शकतो. एजन्सीने म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांमधील तीव्र घटानंतर आता मागणी सुधारण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे बहुतांश कंपन्यांचे उत्पन्न वाढेल.

आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपन्यांकडे निधी उपलब्ध करण्याचे स्रोत उपलब्ध आहेत, मात्र अंदाजांवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांना आव्हानांचा सामना करावा लागेल. मूडीच्या विश्लेषक श्वेता पटौडिया म्हणाल्या, ‘चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) सुमारे 10.6 टक्के घट झाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात मागणी सुधार झाली आणि कमी तुलनात्मक आधारावर, पुढील आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये 10.8 टक्क्यांची चांगली वाढ नोंदविली जाऊ शकते. मूडीजने सांगितले आहे की, 2021 मध्ये भारतीय कॉर्पोरेट्सच्या परिस्थितीत सुधारणा होईल.

मात्र, नवीन संक्रमण वाढतच राहिल्यास एकूणच रिकव्हरी रेट कमी राहील, भलेही तो कमी दराने होऊ दे. म्हणूनच, नवीन लॉकडाउन नाकारता येत नाही, ज्यामुळे पुन्हा ग्राहकांच्या मागणीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकेल. (हेही वाचा: संपूर्ण देशाला दिली जाणार नाही कोरोना विषाणू लस; आरोग्य मंत्रालयाची लसीकरणाबाबत महत्वाची माहिती)

यापूर्वी, मूडीज म्हणाले होते की 2021 साठी उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये बँकांची परिस्थिती नकारात्मक आहे. याउलट, विमा कंपन्यांसाठी ते स्थिर राहील. एशिया प्रशांत क्षेत्रातील बँकांचे वाढते नॉन-परफॉर्मिंग एसेट्स (NPAs) आणि विमा कंपन्यांचा अस्थिर गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ ही चिंताजनक बाब आहे. पुढील दोन वर्षांत आशियातील बँकांची भांडवल कमी होईल. भारताला नवीन गुंतवणूक न मिळाल्यास श्रीलंकेच्या बँकांचे भांडवलही जोरात खाली येईल. केअर रेटिंग्जने म्हटले आहे की, जागतिक साथीने निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे बँकांच्या कर्जाच्या व्यवसायाचा वाढीचा दर नरम होण्याची अपेक्षा आहे.