लद्दाख सीमेवर भारत आणि चीन लष्कराच्या सौनिकांमध्ये धक्काबुक्की
Indian Army AndChinese PLA Face Off | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: ANI)

भारतील लष्कर (Indian Army) आणि चीन लष्कराच्या सौनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे. लद्दाक सीमेवर हा प्रकार बुधवारी घडल्याचे समजते. वृत्तसंस्था एएनआयने भारतीय लष्कराच्या हवाल्याने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पैंगोंग झील परिसराच्या उत्तरेला दोन्ही सौन्यांचा सामना झाला. या परिसरातील काही भाग चीनच्या ताब्यात असल्याचे समजते. भारतीय सैनिक पट्रोलिंग करत होते. दरम्यान, त्यांचा सामना पीपल्स लिबरेशन आर्मी (People's Liberation Army) सोबत झाला. चीनी सैनिकांनी भारतीय जवानांच्या या परिसरातील उपस्थितीवर हरकत नोंदवत विरोध नोंदवला. या वेळीच हा प्रकार घडल्याचे समजते.

दरम्यान, धक्काबुक्कीचा प्रकार घडल्यानंतर दोन्ही बाजूकडील सैन्यसंख्या वाढवण्यात आली. रात्री उशीरपर्यंत हा संघर्ष सुरुच होता. दोन्ही बाजुच्या प्रतीनिधींनी वरिष्ठ पातळीवर संघर्ष केल्यानंतर हा संघर्ष निवळला. दोन्ही बाजूकडील सैनिकांनी आपापल्या विरष्ठांना घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून उभय देशातील लष्काराच्या जवानांकडून आमनेसामने येण्याच्या आणि सीमाउल्लंघनाच्या घटनांमध्ये बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. (हेही वाचा, Image Use For Symbolic Purposes Only )

एएनआय ट्विट

दरम्यान, संरक्षण मंत्रालयानेही 2018-19 या वर्षातील आपल्या अहवालात भारत-चीन सीमेवर उभय देशातील तणाव कमी झाला असल्याचे म्हटले आहे. या अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षाच्या तुलनेत सीमा उल्लंघनाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. तसेच, दोन्ही बाजूंकडून केल्या जाणाऱ्या आक्रमक विधानेही कमालीची कमी झाली आहेत.