पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट; डिझेल पेक्षा दुधाचे भाव अधिक
Imran Khan (Photo- PTI)

भारत (India) शेजारील देश पाकिस्तानात (Pakistan) आश्चर्यचकीत करणारी गोष्टी घडली आहे. पाकिस्तानात पेट्रोल (Petrol), डिझेलपेक्षा (Diesel) दुधाचा  भाव गगणाला भिडला आहे. यामुळे पाकिस्तानात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पाकिस्तानाला अर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान  (Imran Khan) यांनी अनेक देशाकडून अर्थिक मदतीची मागणीदेखील केली आहे. दरम्यान, सौदी अरबियाने (Saudi Arabia) पाकिस्तानाला आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

पाकिस्तानात मोहरम सणाच्या निमित्ताने दुधाची किंमत नियंत्रणातून बाहेर गेली आहे. माहितीनुसार, कराची आणि सिंध शहरात 140 रुपये प्रतिलीटर या दराने विकले जात आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानात दुधापेक्षा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत. दोन दिवसांपूर्वी पेट्रोल 113 रुपये प्रति लीटर विकले जात होते, तर पाकिस्तानमध्ये डिझेल 91 रुपये प्रति लीटर होते. मोहरम सणाच्या निमित्ताने मुस्लिम समुदयातील लोक शरबत तयार करण्यासाठी मोठ्या प्रमणात दुध खरेदी करतात. यामुळे दुधाची मागणी वाढली, असा अंदाज लावण्यात आला आहे. मंगळवारी सिंधमधील काही भागात दुधाची 140 रुपये प्रतिलीटर विक्री झाली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 'डेअरी माफिया' मोहरमच्या निमित्ताने दुधाची वाढती मागणी लक्षात घेता नागरिक लूटमारीवर आले आहेत. तसेच नागरिकांकडून हवा तो दर आकारला जात आहे. हे देखील वाचा-POK ला पुन्हा भारतासह जोडण्याचा मोदी सरकारचा पुढील अजेंडा असणार- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

सध्या पाकिस्तानाची अर्थिक परिस्थिती बिकट आहे. पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी इतर देशांकडून अर्थिक मदत मागितली आहे. तसेच सौदी अरेबियाकडून आर्थिक सहाय्य मिळणार असल्याचे, अशा पाकिस्तान त्यांच्या मनात बाळगत आहे.