Independence Day 2019 PM Modi Speech Live: जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याची विरोधकांमध्ये हिंमत नव्हती, आम्ही ती दाखवली - पंतप्रधान मोदी
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Aug 15, 2019 09:05 AM IST
Independence Day 2019 PM Modi Speech Live: भारत आज (15 ऑगस्ट 2019) आपला 73 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. अशा या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह देशभरात तेव्हाच खऱ्या अर्थाने सुरु होतो, जेव्हा देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन राष्ट्रध्वज (National Flag) फडकवतात. लाल किल्ला (Red Fort) आणि 15 ऑगस्ट यांचे अतूट नाते आहे. गेली 72 वर्षे ही परंपरा कायम आहे. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राजधानी दिल्ली (Delhi) येथील लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवतील. लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवल्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधीत करतात. त्यांच्या या भाषणाबाबत देशभरातून उत्सुकता असते. कारण, सरकारची ध्येय धोरणे, सरकारचे निर्णय, विकास आणि आव्हाने याबाबत अनेक मुद्दे त्यांच्या भाषणात असतात. 2014 आणि त्यानंतर 2019 मध्ये जनमताचा कौल घेऊन एनडीए (NDA) प्रणित भाजप (BJP) सरकार पुन्हा एकदा सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सरकारचे नेतृत्व करत आहेत. आजच्या भाषणात लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातही तिन तलाख, जम्मू-काश्मिर (Jammu and Kashmir) राज्यातून हटवलेले 370 कलम यांसह चांद्रयान, देशात उद्भवलेली पूरस्थिती, दुष्काळ, शिक्षण यांबाबत पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या पंतप्रधानांचे या सत्ताकाळातील हे पहिलेच भाषण आहे. दरम्यान, या सोहळ्यात भारतीय लष्कराचे विविध विभाग आणि बटालीनय लाल किल्ल्यासमोर नेत्रदीपक कवायतीही करत असतात. त्यामुळे या भाषणाचे लाईव्ह अपडेट आम्ही येथे देत आहोत. जाणून घ्या पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील लाईव्ह अपडेट आणि लष्कराच्या कवायतींची क्षणचित्रे.