
Indus Water: पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यावेळी, बदला घेण्यासाठी बंदुक नव्हे तर पाणी हे शस्त्र असणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, (Pahalgam Terror Attack) भारताने 1960 पासून दोन्ही देशांमधील पाणी वाटपाचा आधार असलेला सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत भारत ज्याला शांततेचे प्रतीक मानत होता, ते आता दहशतवादाविरुद्धचे शस्त्र बनले आहे.
भारताचा मास्टर प्लॅन तयार -
पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताचा मास्टर प्लॅन तयार आहे. हा करार स्थगित करून सरकार सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला जाण्यापासून रोखण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे, जो तीन टप्प्यात राबविला जाणार आहे. हे ती टप्पे कोणते आहेत? ते जाणून घेऊयात. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: पाकिस्तानात एक थेंबही पाणी जाणार नाही; अमित शहा यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना निर्देश)
पहिला टप्पा: करार स्थगित करणे
भारताने औपचारिक अधिसूचना जारी करून सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. तथापि, नवीन प्रकल्पांसाठी भारताला पाकिस्तानची परवानगी आवश्यक नाही.
दुसरा टप्पा: धरणे बांधण्यात येणार
भारत आता सिंधू खोऱ्यातील नद्यांवर मोठ्या धरणांची क्षमता वाढवणार आहे. हे पाणी अंतर्गत सिंचन, वीज आणि पाणीपुरवठा वापरासाठी साठवले जाईल. तसेच चिनाब आणि झेलम सारख्या पश्चिमेकडील नद्यांचा प्रवाह पुनर्निर्देशित करण्याचे काम सुरू आहे. (हेही वाचा -Devendra Fadnavis on Pakistani Nationals: पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंबद्दल सहानुभूती नाही; मुख्यमंत्र्यांनी सुरू केली पाकिस्तानींना हाकलून लावण्याची तयारी)
तिसरा टप्पा: पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा हळूहळू बंद करणे
योजनेनुसार, विशेष परिस्थितीत - पूर नियंत्रण, सुरक्षा आणि हवामान आणीबाणीच्या बहाण्याने प्रवाह थांबवता येतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत भारत पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा हळूहळू 'शून्य प्रवाहात' आणू शकतो.
पाणी थांबवणे ही युद्धाची कृती समजली जाईल -
पाकिस्तानने भारताच्या या धोरणाला ही युद्धाची कृती समजली जाईल, असं म्हटलं आहे. पाण्याचा प्रवाह रोखल्याने सीमेपलीकडून प्रत्युत्तर दिले जाऊ शकते, असा इशारा पाकिस्तानने भारताला दिला आहे.
पाकिस्तानची 60% पेक्षा जास्त शेती सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. जर भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवले तर पाकिस्तानला पूर किंवा दुष्काळाची आगाऊ सूचनाही मिळणार नाही. तज्ज्ञांच्या मते, या कारवाईमुळे पाकिस्तानची अन्न सुरक्षा, वीज निर्मिती आणि अंतर्गत शांतता धोक्यात येऊ शकते. तथापि, या करारात एकतर्फी स्थगिती देण्याची परवानगी नाही, परंतु भारताचा असा युक्तिवाद आहे की 'जेव्हा पाकिस्तान सीमेपलीकडून दहशतवाद पाठवतो तेव्हा ते स्वतःच कराराचे उल्लंघन करते.'