CM Devendra Fadnavis | फोटो सौजन्य -ANI

Devendra Fadnavis on Pakistani Nationals: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, (Pahalgam Terrorist Attack) भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत आणि त्यांना 27 एप्रिलपूर्वी भारत सोडून पाकिस्तानात परतण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना ओळखून त्यांना परत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांचे पाकिस्तानी नागरिकांबाबतचे विधानही समोर आले आहे. महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानी कलाकारांबद्दल सहानुभूती नाही -

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, 'आम्हाला पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तानी खेळाडूंबद्दल कोणतीही सहानुभूती नाही. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनाही कळवण्यात आले आहे. कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाने महाराष्ट्रात 48 तासांपेक्षा जास्त काळ राहू नये. आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवू आणि त्यांना देशाबाहेर हाकलून लावू. जास्त काळ थांबणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,' असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Pahalgam Terror Attack: 'जर पंतप्रधान मोदींनी मला बंदूक दिली, तर मी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना मारण्यास तयार आहे'- Abhijit Bichukale (Video))

पंतप्रधान मोदी पाकिस्तानला चोख उत्तर देतील -

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला नक्कीच योग्य उत्तर देतील. मी पाहिले आहे की पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करतात. याआधीही जेव्हा जेव्हा भारतावर हल्ला झाला आहे तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळीही पाकिस्तानला निश्चितच योग्य उत्तर मिळेल. (हेही वाचा: Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे Air India, IndiGo च्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; निवेदन जारी, दिली प्रवासाचे पुनर्नियोजन आणि परताव्याची सुविधा)

सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरे अनुपस्थित -

दरम्यान, पहलगाम हल्ल्याबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावरही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या देशाचा इतिहास असा आहे की जेव्हा जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा सर्व राजकीय पक्ष एकत्र उभे राहतात.