भारताचे लष्कर प्रमुख बनल्यानंतर मनोज मुकुंद नरवणे यांनी शनिवारी पहिली पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, "पीओकेबद्दल बोलायचं झालं तर संसदेत एक ठराव संमत झाला होता की संपूर्ण जम्मू-काश्मीर हा आपला भाग आहे. जर संसदेने इच्छा व्यक्त केली आणि सरकारने आदेश दिला तर पाकिस्तानच्या नियंत्रणातील काश्मीरवर देखील आम्ही नियंत्रण मिळवू. यासाठी भारतीय सैन्य योग्य ती पाऊले उचलेल.''
काश्मीरः जनतेला सैन्याचा पूर्ण पाठिंबा
जनरल नरवणे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकाने चांगले काम केले आहे, मग ते एलओसी असो किंवा दुर्गम भाग. आम्हाला जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे आभारी आहोत. त्यांना लष्कराकडे कोणतीही तक्रार नाही. सीमेवर तैनात असलेल्या कमांडरच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.
दोन आघाड्यांवर युद्धाची तयारी: पुन्हा संतुलन आवश्यक
लष्करप्रमुख म्हणाले की, आम्हाला पश्चिम सीमेवर सर्वाधिक धोका आहे, त्यामुळे सैन्याच्या तुकडीला तेथे सहा अपाचे हेलिकॉप्टर मिळतील. सियाचीन आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा प्रदेश आपल्या दृष्टीने रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. तथापि, भारत-चिनी सैन्यादरम्यान हॉटलाईन प्रस्तावित आहे. लवकरच भारतीय सैन्य संचालनालयाचे महानिदेशक आणि चीनच्या वेस्टर्न कमांड यांच्यात हॉटलाईन सुरू होईल. त्याचबरोबर पाकिस्तान आणि चीन सीमेवर सैन्य तैनात करण्यासाठी पुन्हा संतुलित होणे आवश्यक आहे. देशाच्या उत्तर आणि पश्चिम सीमांना समान लक्ष देणे आवश्यक आहे. जोपर्यंत भारतीय लष्कराचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्यासाठी अल्पकालीन धोका म्हणजे अतिरेक्यांविरूद्ध मोहीम करणे आणि दीर्घावधीचा धोका म्हणजे पारंपरिक युद्ध. आम्ही याची तयारी करीत आहोत.
ते असंही म्हणाले की भारतीय सैन्यात 6 जानेवारीपासून 100 महिला जवानांच्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण सुरु झालं आहे.