हैदराबाद: किराणा दुकानाच्या छतावर गाडीची धाव, पाहा व्हिडिओ
Speeding Car in Hyderabad (Photo Credits-YouTube/TOI)

हैदराबाद (Hyderabad) येथे भरधाव वेगाने आलेल्या एका कारने चक्क किराणा मालाच्या दुकानाच्या छतावर धाव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 7 जण जखमी झाले असून या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 45 वर्षीय भुषण या व्यक्तीने भरधाव वेगाने त्याची मारुती कार किराणा मालच्या छतावर घातल्याचा प्रकार घडला आहे. रस्त्यावरुन चालणाऱ्या एका सायकलवाल्याला चुकवत त्याने डाव्या बाजूला गाडी वळवली. मात्र गाडी एवढ्या वेगाने भुषणने वळवली की ती चक्क दुकानाच्या छतावर जाऊन पोहचली. या प्रकरणी गाडी चालक भुषण याच्यासह त्याच्या परिवारातील अन्य सहाजण जखमी झाले आहेत. छतावर चढलेली गाडी क्रेनच्या सहाय्याने नंतर खाली उतरवण्यात आली. (तामिळनाडू: वृद्ध जोडप्याकडून सशस्त्र दरोडेखोरांचा यशस्वी प्रतिकार; सोशल मीडियावर धाडसी दाम्पत्याचे कौतुक व्हिडिओ)

भुषण हा इलेक्ट्रिल कॉन्ट्रॅक्टर असून एका सोहळ्यावरुन घरी जात असताना हा प्रकार घडला आहे. भुषणच्या गाडीत एअर बॅग नव्हत्या. परंतु भुषण आणि त्याच्या वडिलांनी सीटबेल्ट लावल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. तर दोन दिवसांपूर्वीच भुषण याने भरधाव वेगाने गाडी चालवताना दिसून आला होता.