VIRAL VIDEO | (Photo Credits: ANI)

धाडसाला वयाचं बंधन नसते. तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील तिरुनेलवेली (Tirunelveli) शहरात एका वृद्ध दाम्पत्याने आपल्या कृतीतून हेच दाखवून दिले आहे. या जोडप्याने त्यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांना असा काही प्रतिकार केला की, दरोडेखोरांनी स्वत:चाच बचाव करत थेट पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वृद्ध दाम्पत्याचे धाडस पाऊन सोशल मीडियावर त्यांचे जोरदार कौतुक केले जात आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, दोन दरोडेखोर हातात शस्त्र घेऊन एका घराच्या अंगणात येतात. दोघांच्याही हातात कोयता पाहायला मिळतो. एक दरोडेखोर अंगणात खुर्चीवर बसलेल्या वृद्धाच्या गळ्यात रुमाल टाकून तो आवळण्याचा प्रयत्न करतो. तसेच, हातातील कोयत्याने त्यांना धमकावण्याचाही प्रयत्न करतो. दरम्यान, घरातील महिला बाहेर येते. ती त्या दरोडेखोरांवर वस्तू फेकून मारते. या झटापटीत वृद्ध व्यक्ती खुर्चीवरून खाली पडतो. दरोडेखोरांचे धमकावणे सुरुच असते इतक्यात वृद्ध व्यक्ती त्या दरोडेखोरांवर खुर्ची, फेकोत महिलाही त्या दरोडेखारोंचा निकराने प्रतिकार करते. खुर्ची, चप्पल, स्टूल जे काही हाती लागेल ते घेऊन हे वृद्ध दाम्पत्य त्या दरोडेखोरांचा प्रतिकार करतात. अखेर, या दरोडेखोरांनी स्वत:चा बचाव करत पळ काढला. (हेही वाचा, माकडाचा 'देसी स्टाइल' मधील कपडे धुण्याचा अंजाद नेटकऱ्यांना भावला, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video))

एएनआय ट्विट

तामिळनाडू राज्यातील या जोडप्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. हे जोडपे वृद्ध आहे. त्यांनी दाखवलेले धाडस आणि केलेला यशस्वी प्रतिकार हे या कौतुकाचे कारण आहे. एएनआयने शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांनी रिट्विट केला आहे तर अनेकांनी लाईक केला आहे. प्रसंगावधान राखत प्रतिकार करणे सर्वांनाच शक्य नाही. परंतू, या दाम्पत्याने दाखवलेल्या धाडस कौतुकास्पदच आहे.