माकडाचा 'देसी स्टाइल' मधील कपडे धुण्याचा अंजाद नेटकऱ्यांना भावला, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)
Monkey washing clothes (Photo Credits: Video grab)

सध्या सोशल मीडिया एवढ्या गोष्टी व्हायरल होत असतात की ते पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या जातात. काही व्हिडिओमधील एखादा थरारक स्टंट, डान्स करण्याची पद्धत किंवा अन्य गोष्टी पाहून आपल्याला सुद्धा थक्क व्हायला होते. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियात व्हायरल झाला असून चक्क माकड देसी पद्धतीने कपडे धुताना दिसून येत आहे.

व्हायरल झालेला माकडाचा व्हिडिओ हा नेमका कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा आहे हे कळू शकले नाही. मात्र माकडाचा कपडे धुण्याचा देसी अंजाच चांगलाच नेटकऱ्यांना भावला आहे. भारतीय नागरिकसुद्धा अशाच पद्धतीने कपडे धुत असल्याचा प्रत्यय येथे दिसून येत आहे. परंतु नेटकऱ्यांना माकडाची कपडे धुण्याची ही पद्धत फार पसंद पडली असून प्रचंड प्रमाणात एकमेकांना तो व्हिडिओ शेअर केला जात आहे.(मुंबई लोकलमध्ये चढण्यासाठी जेव्हा मुंबईकरांना सुपरमॅन व्हावे लागते, पाहा मजेशीर व्हिडिओ Watch Video)

काही नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून माकडाकडून काहीतरी शिका असे म्हटले आहे. तसेच माकडाने कपडे धुताना पाण्याचा केलेला वापर आणि पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेताना दिसून येत असल्याचे ही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.