मुंबई लोकलमध्ये चढण्यासाठी जेव्हा मुंबईकरांना सुपरमॅन व्हावे लागते, पाहा मजेशीर व्हिडिओ  (Watch Video)
Mumbai Local Viral Video (Photo Credits-Twitter/@TarunnSarreen)

मुंबईची लाईफलाइन असणाऱ्या लोकलने दररोज हजारोंपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात. तसेच एखाद्यावेळेस ट्रेन सुटली तरीही प्रवासी त्याबद्दल खंत व्यक्त करतात. तसेच  लोकल 10 मिनिटे जरी उशिराने आल्यास त्यामध्ये असलेली गर्दी पाहूनच काही मुंबईकर तेथूनच लोकलला रामराम ठोकतात. परंतु काही नागरिक एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा लोकलमध्ये चढण्याचे धाडस करतात. असाच एक किस्सा मुंबईतील लोकलमध्ये दिसून आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ हा नेमका कोणत्या स्थानकावरील आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र ट्वीटरवरील एका युजर्सने याचा व्हिडिओ काढला असून त्यामध्ये रेल्वेस्थानकात प्रचंड गर्दी दिसून येत आहे. लोकल आल्याने प्रत्येकाची त्यामध्ये चढण्यासाठी चढाओढ दिसतेय. मात्र या गर्दीतील सुपरमॅन चक्क लोकलच्या दरवाज्याला वरच्या बाजूने घट्ट पकडून ठेवत लटकून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु लोकल बाहेरील गर्दीने त्याला बाहेर फेकल्याचे दिसून येत आहे.(चेन्नई: 7 वर्षांच्या मुलाच्या तोंडातून डॉक्टरांनी काढले तब्बल 526 लहान-मोठे दात; पहा फोटोज)

रेल्वेस्थानकावरील घडलेला हा प्रकार अतिशय हास्यात्मक आहे. पण नागरिकांनी गर्दीच्या वेळेस असे प्रकार करत लोकलमध्ये शिरण्याचे धाडस न करण्याचे आवाहन केले जाते. तरीही नागरिक गर्दीतून वाट काढत लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. या भयंकर प्रकारामुळे एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो.