देशात 1 जून पासून सुरु होणाऱ्या 200 प्रवासी ट्रेन्सचे तिकीट कसे बुक कराल? irctc.co.in वरुन तिकीट बुक करण्यासाठी स्टेप्स
File image of passengers waiting for trains (Photo Credit: PTI)

देशात 1 जून पासून 200 प्रवासी रेल्वे गाड्या धावणार असल्याचे भारतीय रेल्वेने जाहीर केले. या प्रवासी गाड्यांची बुकींग आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे. IRCTC च्या अधिकृत वेबसाईट किंवा अॅप वरुन तुम्ही या गाड्यांचे बुकींग करु शकता. विशेष म्हणजे सध्या केवळ ऑनलाईन बुकींग सुरु आहे. रेल्वेच्या आरक्षण कक्षावर तिकीट विक्री बंद आहे. त्यामुळे IRCTC ची अधिकृत वेबसाईट irctc.co.in वर जावून तिकीट बुकींग करता येईल.  (Lockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज?)

प्रवासपूर्वी ई-तिकीट असलेल्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी ही विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या 200 प्रवासी रेल्वे गाड्यातून सर्व कोटा प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच या विशेष रेल्वे ट्रेन्समधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य असणार आहे. (भारतीय रेल्वेने प्रसिद्ध केली 1 जून पासून धावणाऱ्या 200 गाड्यांची यादी; कर्नाटकमध्ये सुरु होणार राज्यांतर्गत Train Service, जाणून घ्या प्रवासाचे नियम)

IRCTC च्या वेबसाईटवरुन तिकीट कसे बुक कराल? 

# 1 जून पासून सुरु होणाऱ्या या 200 प्रवासी ट्रेन्सचे तिकीट बुकींग आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होत आहे.

# तिकीट बुक करण्यासाठी IRCTC च्या अकाऊंटवर तुमच्या रजिस्ट्रर आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करा.

# "Book your ticket" हे पेज ओपन होईल.

# त्यानंतर कुठून कुठे प्रवास करायचा आहे त्याची माहिती द्या. त्याचबरोबर प्रवासाची तारीख आणि क्लास ही माहिती भरा.

# ट्रेनची यादी पाहण्यासाठी "Find trains" या पर्यायावर क्लिक करा.

# ट्रेनची निवड केल्यानंतर type of class वर क्लिक करा.

# रेल्वेमध्ये सीटची उपलब्धता आणि तिकीटाची किंमत जाणून घेण्यासाठी "Check availability and fare" या टॅबवर क्लिक करा.

# त्यानंतर निवड केलेल्या ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी "Book now" वर क्लिक करा.

# परतीच्या प्रवासाचे बुकींग करण्यासाठी "Book Return/Onward Ticket" वर क्लिक करा.

# प्रवाशाचे नाव, वय, लिंग ही माहिती भरा. त्यानंतर बर्थ आणि फूड याची तुमच्या गरजेनुसार निवड करा.

# बोर्डिंग स्टेशन बदलायचे असल्यास "Change Boarding Station" वर क्लिक करा.

# सर्व माहिती अचूक भरल्यानंतर "Continue Booking" वर क्लिक करा.

# बुकींगमध्ये काही बदल करायचे असल्यास "Replan Booking" वर क्लिक करा.

# युजर्स क्रेडिट कार्ड, नेट बँकींग, पेमेंट वॉलेट्स किंवा इतर पेमेंट ऑप्शनच्या माध्यमातून तिकीटाचे पेमेंट करु शकतात.

# पेमेंट यशस्वीरित्या झाल्यानंतर तिकीट कन्फर्मेशनचे पेज ओपन होईल.

# प्रवाशांना ई-मेल किंवा एसएमएस च्या माध्यमातून तिकीट पाठवण्यात येईल.

# रिजर्व्हेशन स्लिपची (ERS) प्रिंट काढायची असल्यास प्रिंट तिकीट ऑप्शनवर क्लिक करा.

भारतीय रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन सुटण्याच्या 4 तास अगोदर तिकीट कर्न्फम झालेल्या प्रवाशांची पहिली यादी तयार करण्यात येईल आणि 2 तास अगोदर दुसरी यादी तयार करण्यात येईल. RAC आणि वेटींग लिस्ट ही पूर्वीच्या नियमांनुसारच बनवली जाईल. वेटींग लिस्ट असलेल्या प्रवाशांना ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी नाही. या विशेष ट्रेन्सचे कोणतेही अनारक्षित तिकीट देण्यात येणार नाही आणि त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान कुठल्याही प्रवाशाला चालू तिकीट देण्यात येणार नाही.

ट्रेन सुटण्याच्या 90 मिनिट अ्गोदर स्टेशनवर उपस्थित राहणे आवश्यक असून मास्क घालणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसंच पाणी आणि खाद्यपदार्थ प्रवाशांनी स्वतः आणावेत. त्याचबरोबर ब्लॉकेट्स, पडदे याची सोय प्रवासात उपलब्ध असणार नाही.