Hand Transplant | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Hand Transplant in Delhi: अवयवदान (Organ Donation) आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेले अवयव प्रत्यारोपण (Organ Transplantation) यांमुळे दिल्ली येथील एका पेंटरला त्याचे दोन्ही हात परत मिळाले आहेत. या पेंटरने एका मोठ्या अपघातात आपले दोन्ही हात गमावले होते. त्यामुळे त्याच्या हालचाली, कला आणि जीवन जगण्यावरही प्रचंड मर्यादा आल्या होत्या. दरम्यान, एक महिला अवयवदाता भेटल्याने या पेंटरवर हात प्रत्यारोपन शस्त्रक्रिया (Organ Transplant Surgery) करण्यात आली. दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पीटलमध्ये (Sir Ganga Ram Hospital) डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यामुळे पेंटरला त्याचे हात पुन्हा मिळाले आहेत. आता तो नैसर्गिकपणे सर्व हालचाल करु शकतो, असा डॉक्टरांचा दावा आहे. ज्यामुळे 'गब्बर काळाच्या नाकावर टिच्चून पेटर चालवणार ब्रश' असे बोलले जाऊ लागले आहे.

रेल्वे अपघातात गमावले हात

रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावल्यामुळे हा 45 वर्षीय पेंटर दिल्लीतील रुग्णालयात आपल्या मृत्यूची वाट पाहात होता. त्याला आपल्याला आयुष्यात पुन्हा कधीच हात मिळणार नाही, या कल्पनेनेच निराश करुन टाकले होते. जवळपास सन 2020 पासून हा पेंटर हाताशिवाय आयुष्य जगत होता. दरम्यान, त्याच्या आयुष्यात एक अत्यंत सकारात्मक घटना घडली. एका महिलेने अवयवदानांतर्गत आपले आत दान करण्याची प्रतिज्ञा केली होती. डॉक्टरांनी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेद्वारे दिल्लीतील डॉक्टरांनी या पेंटरला त्याचे दोन्ही हात शस्त्रक्रिया करुन बसलवे. परिणामी या व्यक्तीच्या तरुणात प्रचंड सकारात्मक बदल घडला. दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पटल येथे ही शस्त्रक्रिया पार पडली. या पेंटरला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. (हेही वाचा, Delhi: डॉक्टरांची कमाल! 3 कापलेली बोटे पुन्हा जोडली; पायाच्या बोटापासून बनवला हाताचा अंगठा, दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील घटना)

ब्रेन डेड व्यक्तीचे मिळाले हात

मीना मेहता, असे अवयव दान करणाऱ्या महिलेचे नाव आहे. मीना या दक्षिण दिल्ली येथील एका शाळेत व्यवस्थापक म्हणून काम करत होत्या. दरम्यान, वैद्यकीय उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना ब्रेन-डेड घोषीत केले. मीना यांनी ब्रेन-डेड होण्यापूर्वीच अवयव दान करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. मीनायांच्या निर्णयामुळे 45 वर्षीय पेंटर पुन्हा एकदा हातात ब्रश पकडू शकणार आहे. मीना यांनी केवळ हातच नव्हे तर किडणी, लिव्हर आणि कॉर्निया यांसारखे महत्त्वाचे अवयवही दान करण्याचा निर्णय घेतला होता. (हेही वाचा, Organs Donate: मृत्यूमुळे शरीर संपले, अवयव मात्र जीवंत; डोळे, फुफ्फुस, यकृत, किडनी, मूत्रपिंड कार्यरत, अवयवदानाची कमाल)

अवयवदाता तयार होता, हातही तयार होते पण, एखादी वस्तू जोडण्याईतके हात पुन्हा जोडणे सोपे नव्हते. हिमालयायेवढी कामगिरी करण्यासाठी डॉक्टरांसमोरही तेवढेच मोठे आव्हान होते. असे असले तरी, सर गंगाराम हॉस्पीटल मध्ये काम करणाऱ्या निष्णात डॉक्टरांनी तब्बल 12 तास चाललेली शस्त्रक्रीया यशस्वीपणे पूर्ण केली. हाताचे प्रत्यारोपण यशस्वी झाले. डॉक्टरांनी अवयवदात्याच्या हातातील प्रत्येक धमनी, शिरा आणि स्नायू पेंटरच्या हाताशी यशस्वीरित्या जोडले. शस्त्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पेंटरने डॉक्टरांचे आभार माणण्यासाठी थम्सअपची केलेली खूण सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारी होती.