Hajj Yatra 2020: यंदा हज यात्रा सौदी अरेबिया मध्ये मर्यादित उपस्थितीत पार पडणार; भारतीय भाविकांना मात्र परवानगी नाही, मुख्तार अब्बास नकवी यांंची माहिती
Minister Abbas Naqvi On Hajj 2020 (Photo Credits: ANI)

मुस्लिम धर्मीयांसाठी वर्षभरातील खास उत्सव म्हणजेच हज यात्रा (Hajj Yatra 2020) यंदा मात्र कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर रद्द करण्याचे ठरले आहे, परंपरा म्हणून सौदी अरेबिया (Saudi Arabia) मधील अगदी मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडेल. मात्र यासाठी भारतीय भाविकांना जाण्याची परवानगी मिळणार नाही, याबाबत अल्पसंख्यांक मंत्री अब्बास नकवी (Abbas Naqvi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा भारतातील भाविकांना हज यात्रेसाठी पाठवले जाणार नाही, ज्यांनी या साठी अगोदरच बुकींग केले होते त्यांना कोणतेही पैसे न कापता थेट बँक अकाउंट मध्ये ट्रान्स्फर केले जातील. प्राप्त माहितीनुसार यंदा भारतातून हज यात्रेसाठी जवळपास 2.3 लाखाहून अधिक भाविकांनी बुकिंग केले होते.  हज यात्रा रद्द करू इच्छित असलेल्या लोकांना मिळणार Full Refund, जाणून घ्या कुठे करावा अर्ज

यावर्षी हज यात्रा 28 जुलैपासून सुरू होणार आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी उशिरा एक प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे की, सौदी अरेबिया मधील मर्यादित नागरिकांनाच हज साठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल. याचा अर्थ सौदी अरेबियातून बाहेरून आलेल्या यात्रेकरूंना प्रवेश घेता येणार नाही. हा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून घेण्यात आला आहे. याशिवाय उपस्थितांना सर्व प्रकारच्या प्रतिबंधक उपाय आणि आवश्यक सोशल डिस्टंसिंग प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, मागील वर्षी जवळपास 25 लाख यात्रेकरूंनी हज साठी उपस्थिती लावली होती. यापैकी 18 लाख भाविक हे बाहेरुन आलेले होते. मात्र सध्या कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे यंदाच्या हज यात्रेबाबत शंका निर्माण झाली होती. आता हज यात्रा अंतिमतः रद्द करण्यात आली आहे. इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया यांनी यावर्षीच्या हज मध्ये नागरिक सहभागी होणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते.