4 प्रेयसींवर आपली छाप पाडण्यासाठी चोरी करायचा नव्या कार, पोलिसांनी प्रियकराला ठोठावल्या बेड्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आपल्या प्रेयसीवर छाप पाडण्यासाठी प्रियकर काय काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही.  प्रियकर आपल्या 4 विविध प्रेयसींवर छाप पाडण्यासाठी गुडगाव आणि दिल्ली येथून नव्या कार चोरी करायचा. या प्रकरणी आरोपी प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोठावल्या आहेत.

एप्रिल महिन्यात सनम सचिन ह्याला पोलिसांनी कार चोरी प्रकरणी यापूर्वी अटक केली होती. तसेच 3 दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती. परंतु सचिन हा लोकांना त्याच्या बोलण्यात फसवून त्यांच्या नव्या गाड्या चोरी करायचा. तर दिल्ली आणि गुरुग्राम येथे त्याच्या नावावर 30 गाड्या चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे.(हेही वाचा-अबब! ब्रामध्ये 47 लाख रुपयांचं सोनं; महिलेला चेन्नई विमानतळावर मुद्देमालासह अटक)

हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या वृत्तात पोलिसांनी असे म्हटले आहे की, राजोक्री येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर अटक केल्यानंतर आरोपीची तपासणी करताना त्याने असे सांगितले की नव्या कार चालवण्याचे फार वेड असून प्रेयसींवर छाप पाडण्यासाठी अशा मार्गाने चोरी करायचा. लोकांना आपल्या बोलण्यात अडकवून त्यांच्या गाड्यांची चावी बळाकवत असल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.