जुलै महिन्यात 1.16 लाख कोटी रुपयांचा GST Collections, गेल्या वर्षाच्या तुलनेत 33 टक्के अधिक
GST | Representational Image | (Photo Credits: PTI)

जुलै महिन्यात GST Revenue हा 1,16,393 कोटी रुपये जमा झाला आहे . गेल्या वर्षाप्रमाणेच याच कालावधीच्या तुलनेत 33 टक्के तो यंदा जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. जुलै 2020 मध्ये एकूण जीएसटी 87,422 कोटी रुपये होता. तर गेल्याच महिन्यात म्हणजे जून 2021 मध्ये जीएसटी कलेक्शन हा 92,849 कोटी रुपये होता. जीएटसीची समोर आलेली आकडेवारी अर्थव्यवस्थेत तेजी असल्याचे दर्शवत आहे.(LPG gas cylinder: महिन्याच्या सुरूवातीला सर्वसामान्यांना पहिला धक्का, एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ)

यामध्ये CGST हा 22,197 कोटी रुपये, SGST 28,541 कोटी रुपये आणि IGST 57,864 रुपये आहे. तर सेस हा 7790 कोटी झाला आहे. ही आकडेवारी 1 जुलै ते 31 जुलै 2021 दरम्यानची असून GSTR-3B return मधून मिळालेल्या GST Collection वर आधारित आहे. यामध्ये समान कालावधीत आयात मधून मिळालेला IGST आणि Cess चा सुद्धा समावेश आहे.(Passport Application: नवीन पासपोर्ट काढण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक? येथे पहा संपूर्ण यादी)

Tweet:

जुलै 2021 महिन्यात Regular Settlement नंतर केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 50284 कोटी आणि एसजीएसटीसाठी 52641 रुपये आहे. तसेच जुलै महिन्याचा महसूल हा गेल्या वर्षात याच महिन्यातील जीएसटी महसूल पेक्षा 33 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षाच्या तुलेत समान अवधिच्या मालाच्या आयातामुळे महसूल 36 टक्के अधिक आणि देशाअंतर्गत सेवा आणि आयातामधून महसूल 32 टक्के आहे.