सरकार कडून 41 औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये मधुमेह, हृद्यविकाराशी निगडीत आजार आणि अन्य आजारांचा समावेश आहे. Department of Pharmaceutical and National Pharmaceutical Pricing Authority च्या जारी परिपत्रकामध्ये हृद्यरोग, मधुमेह, लिव्हरशी निगडीत आजार, अॅन्टासिड, अॅलर्जी, इंफेक्शन, मल्टिव्हिटॅमिन, अॅन्टिबॉडीजच्या औषधांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.
"औषधांच्या किंमती आणि फॉर्म्युलेशन बदलणे हे NPPA सारख्या नियामक संस्थेसाठी एक प्रकारचे नियमित काम आहे. लोकांसाठी आवश्यक असलेल्या औषधांवर कमाल मर्यादा आहे आणि किंमत परवडणारी राहील," असे NPPA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे .
10 कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण असलेला भारत हा जागतिक स्तरावर सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये आहे. या किंमती कपातीमुळे औषधे आणि इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या अनेक रुग्णांना फायदा होणार आहे. NPPA च्या 143 व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
पूर्वी, मल्टीविटामिन आणि अॅन्टिबायोटिक्सच्या जास्त किंमतींनी सामान्य उपचारांमध्ये आर्थिक भार होता. गेल्या महिन्यात, फार्मास्युटिकल्स विभागाने 923 शेड्यूल्ड औषध फॉर्म्युलेशनसाठी वार्षिक सुधारित कमाल मर्यादा किंमती आणि 65 फॉर्म्युलेशनसाठी सुधारित किरकोळ किमती जाहीर केल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला एनपीपीएने मधुमेह आणि उच्च रक्तदाबामध्ये वापरल्या जाणाऱ्या ६९ औषधांच्या किमती कमी केल्या होत्या. दरम्यान, फार्मास्युटिकल्स विभागाने अधिक उद्योग सहभागी आणून औषध आणि वैद्यकीय उपकरणांच्या किंमती सुधारण्याच्या प्रयत्नांवर देखरेख करण्यासाठी समितीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.