Gold Rate | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Gold Rate In India Today: जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून आली आहे. त्याचसोबत भारतातील दिल्ली येथे असलेल्या सराफ बाजारातसुद्धा सलग दुसऱ्या दिवशी सोने व चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि चीन या दोन देशातील सुरु असलेलं सध्याचं व्यापार युद्ध. आज (बुधवारी) दिल्लीच्या सराफ बाजारात 24 कॅरट सोन्याचा भाव 332 रुपयांनी वाढला आहे तर चांदीच्या भावातही 676 रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली.

आज बाजारात सोन्याचा दर 39 हजार 299 रुपये प्रतितोळा आहे तर चांदीचा दर  46 हजार 672 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.

सोने खरेदी करायचा हा नियम जरूर वाचा:

केंद्र सरकार 15 जानेवारी 2020 ला सोने खरेदी करण्याचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. या नियमानुसार, सोन्याचे दागिने आणि कलाकृतींवर BIS हॉलमार्किंग असणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे.

खुशखबर! क्रेडिट कार्डने LIC चा हफ्ता भरल्यास ग्राहकांना अतिरिक्त सेवा शुल्क होणार माफ

सोने खरेदी करताना जे हॉलमार्किंग करण्यात येतं ते ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड करत असते. ग्राहकांना जे सोनं विकलं जातं त्याच्या गुणवत्तेची चाचणी ही संस्था करते. आणि ज्या सोन्यावर हॉलमार्किंग केलेलं असतं ते सोनं शुद्ध मानलं जातं आणि हॉलमार्किंग केल्यावर सोन्याच्या दागिन्यांसोबत त्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्रही मिळतं.

आणि हा नियम मोडल्यास 1 लाख रुपये दंड आणि एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.  तसेच सोनं खरेदी करताना बिल घेणं आवश्यक आहे.