खुशखबर! क्रेडिट कार्डने LIC चा हफ्ता भरल्यास ग्राहकांना अतिरिक्त सेवा शुल्क होणार माफ
LIC | (File Photo)

आपली व आपल्या कुटूंबाची भविष्याची तरतूद म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) डीजिटल व्यवहाराना प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाची घोषणा केली असून त्यात क्रेडिट कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना सेवा शुक्ल माफ करण्यात आले आहे. 1 डिसेंबरपासून 'एलआयसी'कडून डिजिटल माध्यमातून पैसे भरणाऱ्या ग्राहकांना शुल्क माफ करण्यातआले आहे.लोकांच्या भविष्याची तरतूद म्हणून काढलेली LIC सुरळीत सुरु राहण्यासाठी महिन्याचे बजेट करताना त्याचे हफ्ते कसे भरायचे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. अशावेळी रोख रक्कम भरताना अनेकदा अडचणी येण्याची शक्यता असते.

सध्या डिजिटल माध्यम खूप तेजीत आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना या माध्यमाचा वापर करावा आणि या डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन द्यावे यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाने ही सेवा सुरु केली आहे.

हेदेखील वाचा- LIC येत्या 30 नोव्हेंबरपासून अनेक विमा पॉलिसी प्लान करणार रद्द ; पाहा काय आहे कारण?

क्रेडीट कार्डने LIC चा व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना पैसे भरताना आकारले जाणारे शुल्क (convenience fee) रद्द करण्यात आले आहे. यापुढे प्रिमियम , कर्जाचा हप्ता , व्याज आदी शुल्क क्रेडीट कार्डने अदा केल्यास ग्राहकाला सेवा शुल्कातून सूट मिळेल, असे 'एलआयसी'ने प्रसिध्दि पत्रकात म्हटले आहे.

ऑनलाईन नेटबँकिंग द्वाराही तुम्ही LIC चा हफ्ता भरू शकता. ही ग्राहकांसाठी खूपच चांगली बातमी असून रोख रक्कम भरताना भराव्या लागणा-या अतिरिक्त सेवा शुल्कापासून त्यांची सुटका होऊ शकते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन LIC कडून करण्यात आले आहे.