Gold | Photo Credits: Pixabay.com)

देशातील ज्या लोकांनी सोन्यामध्ये (Gold) गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. मजबूत अशा जागतिक ट्रेंड दरम्यान दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव (Gold Rate) 1,025 रुपयांनी वाढून तब्बल 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. हा सोन्याचा सर्वकालीन उच्चांक आहे. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 60,055 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीचा भावही 1,810 रुपयांनी वाढून 73,950 रुपये किलो झाला.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) सौमिल गांधी यांच्या मते, दिल्लीतील स्पॉट सोन्याची किंमत 61,080 रुपये होती, जी प्रति 10 ग्रॅम 1,025 रुपये वाढ दर्शवते. परदेशी बाजारात सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे 2,027 डॉलर प्रति औंस आणि 24.04 डॉलर प्रति औंस या पातळीवर होते. यूएस मॅक्रो इकॉनॉमिक डेटा रिलीझ झाल्यानंतर यूएस डॉलर इंडेक्स आणि बाँडच्या उत्पन्नात घसरण याचा प्रामुख्याने सराफा किमतींवर परिणाम झाला. (हेही वाचा: PPF April 5 Deadline: जास्त रिर्टन्ससाठी आजच करा पीपीएफमध्ये करा डिपॉझिट, जाणून घ्या कारण)

गुड रिटर्न्सनुसार, वृत्त लिहिपर्यंत सराफा बाजारात सोन्याचे भाव पुढीलप्रमाणे आहेत-

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 61,510 रुपये.

जयपूरमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,510 रुपये.

पाटण्यात सोन्याचा भाव 24 कॅरेटच्या 10 ग्रॅमसाठी 61,400 रुपये आहे.

कोलकातामध्ये सोन्याचा भाव 24 कॅरेटच्या 10 ग्रॅमसाठी 61,360 रुपये आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 61,360 आहे.

बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 61,410 रुपये.

हैदराबादमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,360 रुपये आहे.

चंदीगडमध्ये सोन्याचा भाव 61,510 रुपये आहे.

लखनौमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 61,510 रुपये आहे.

केवळ सोनेच नाही तर ज्यांनी जागतिक चलन डॉलर विकत घेऊन स्वतःजवळ ठेवले होते, त्यांनाही प्रचंड नफा झाला आहे. 10 वर्षांपूर्वी एक डॉलरच्या तुलनेत रुपया 54 च्या पातळीवर व्यवहार करत होता. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये मोठी कमजोरी दिसून आली. परिणामी एका डॉलरच्या तुलनेत रुपया 82 रुपयांच्या पातळीवर घसरला. 10 वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया 51 टक्क्यांनी घसरला आहे.