जास्तीत जास्त वार्षिक परतावा मिळविण्यासाठी PPF खातेधारकांनी त्यांचे FY24 योगदान आज, 5 एप्रिल रोजी जमा करणे आवश्यक आहे. कारण PPF चा व्याजदर महिन्याचा पाचवा दिवस आणि महिन्याच्या शेवटचा दिवस यावेळच्या किमान शिल्लकच्या आधारे मोजला जातो. म्हणून 5 एप्रिलपर्यंत PPF खात्यात तुमचा निधी जमा होईल याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ, जर तुमची PPF खात्यातील शिल्लक रुपये 2 लाख असेल आणि तुम्हाला एकाच वेळी 1.5 लाख रुपयांचे आणखी योगदान करायचे असेल, तर 5 एप्रिलनंतर गुंतवलेली अतिरिक्त रक्कम काही व्याजाचा परतावा हा तुम्हाला मिळणार नाही.
5 एप्रिलपूर्वी 1.5 लाख रुपयांचे अतिरिक्त योगदान गुंतवले असल्यास, तुमची नवीन PPF खात्यातील शिल्लक 3.5 लाख रुपये असेल (आधी 2 लाख रुपये आणि आता गुंतवलेले 1.5 लाख रुपये). PPF नियमांनुसार, कॉर्पसवरील मासिक व्याज संपूर्ण 3.5 लाख रुपयांवर मोजले जाईल, जे सुमारे 2,070 रुपये आहे. तथापि, 5 एप्रिलनंतर 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम गुंतवल्यास, ते एप्रिल महिन्यासाठी मोजलेल्या व्याजासाठी विचारात घेतले जाणार नाही.
लहान बचत योजनांचा भाग असलेल्या पीपीएफवर सध्या वार्षिक 7.1 टक्के व्याजदर मिळते. दर तिमाही आधारावर त्याचे पुनरावलोकन केले जाते. गेल्या आठवड्यातील ताज्या आढाव्यात, एप्रिल-जून 2023 तिमाहीसाठी व्याजदर 7.1 टक्क्यांवर ठेवण्यात आले होते. एक गुंतवणूकदार या योजनेंतर्गत कमीत कमी रु 500 आणि जास्तीत जास्त रु 1,50,000 पर्यंत गुंतवणूक करू शकतो.