गोवा येथे पार पडलेल्या Sunburn फेस्टिव्हलमध्ये 3 पर्यटकांचा मृत्यू, विरोधकांनी सरकारला पकडले वादाच्या भोवऱ्यात
Sunburn Music Festival (Photo Credits: IANS)

गोवा येथे पार पडणाऱ्या सर्नबर्न फेस्टिव्हलची धुम निराळीच असते. मात्र यंदाच्या सर्नबर्न फेस्टिव्हल मध्ये हैरदाबाद येथून आलेल्या 3 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणांचा मृत्यू अतिप्रमणात ड्रग्ज घेतल्याने झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर विरोधकांनी सरकारला वादाच्या भोवऱ्यात चांगलेच पकडले असून हा फेस्टिव्हल बंद करण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर सरकार तरुणांच्या मृत्यूचे खरे गूढ लपवून ठेवत असल्याचा आरोप लावला आहे. पोलिसांच्या मते तीन तरुणांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सरकार खरे कारण कधीच समोर येऊ देणार नसल्याचे विरोधकांनी म्हटले असून 2008 आणि 2014 मध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली होती.

सर्नबर्न फेस्टिव्हल वरुन निर्माण झालेल्या वादानंतर राज्याचे पर्यटन मंत्री बाबू आजगांवकर यांनी स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, सर्नबर्न सारखे फेस्टिव्हलसाठी परवानगी देण्याबाबत विचार करण्यात येईल. परंतु या फेस्टिव्हल मुळे राज्याला 250 करोड रुपयांचा नफा होते. तसेच खाणकामावर बंदी असल्याने नुकसान भरपाई होत आहे. त्यामुळेच असे फेस्टिव्हल येथे राबवले जात असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. परंतु विरोधकांनी यावर टीका करत तरुणांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे म्हटले आहे.

गोवा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तीन तरुण सर्नबर्न फेस्टिव्हलच्या बॉक्स ऑफिस जवळ उभे होते. हे तीन तरुण फेस्टिव्हल सुरु होण्याची वाट पाहत होते पण त्या दरम्यान त्यांची तब्येत खराब झाल्याने खाली कोसळले गेले. त्यानंतर या तिघांना तातडीने म्हापसा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तेथील डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.(New Year Party मध्ये परवानगी न घेता हवे ते गाणे लावल्यास होऊ शकते कारवाई; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश)

सर्नबर्न फेस्टिव्हलची सुरुवात 2007 मध्ये गोव्यात झाली. सध्या या फेस्टिव्हला जगातील तिसऱ्या क्रमांवरील शो मानला जातो. या फेस्टिव्हलमध्ये जवळजल 52 देशांतील लोक सहभागी होतात. पण सर्नबर्न फेस्टिव्हल मुळे यापूर्वी सुद्धा वाद निर्माण झाले होते. त्यामुळे गोवा येथून सर्नबर्न फेस्टिव्हल 3 वर्षांसाठी पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.