देशभरात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. तसेच गणेश विसर्जनावेळी ही नागरिकांमध्ये प्रचंड आनंद दिसून येतो. मात्र गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक वेळी नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले जाते. परंतु काही सूचनांकडे लक्ष न दिल्यास दुर्घटना घडल्याचे प्रकार समोर आले आहेत.
गणेशोत्सवावेळी महाराष्ट्रसह देशातील विविध ठिकाणी गेली 11 दिवस गणपतीची मनोभावे पूजा करण्या आली. मात्र विसर्जनावेळी समुद्रात बुडून आता पर्यंत विविध राज्यातील 40 जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मृतांचा आकडा हा गेल्या 24 तासांमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.(गणपती विसर्जन करताना नाव उलटली, 11 जणांचा मृत्यू, 5 थोडक्यात बचावले)
दिल्ली मधील 4 कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी विसर्जनावेळी जीव गमावला आहे. तत्पूर्वी भोपाळ येथे होडी उलटी झाल्याने या प्रकरणी 11 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 12 वर्षीय मुलाचा सुद्धा बुडून मृत्यू झाला होता.तर शुक्रवारी यमुना नदीत अंघोळ करण्याचा हट्ट करणाऱ्या दोन मुलांचा आणि दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्रात गणपती विसर्जनावेळी विविध राज्यातील 18 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
तर लालबागचा राजाच्या मिरवणुकीत भाविकांच्या बहुमूल्य वस्तू लंपास करणा-या 8 चोरट्यांना बेड्या ठोकल्या. या चोरांकडून नागरिकांच्या मोबाईल, पाकिटे, रोख रक्कम यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या.