Gandhi Jayanti 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंती निमित्त बुद्धीवाद्यांना दिले Einstein Challenge; जगप्रसिद्ध दैनिकात लिहिला लेख
Albert Einstein, PM Narendra Modi, Mahatma Gandhi | (Photo credit: Archived, edited, representative images)

Gandhi Jayanti 2019: राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी द न्यू यॉर्क टाइम्स या जगप्रसिद्ध दैनिकासाठी एक लेख लिहिला आहे. या लेखात पंतप्रधान मोदी यांनी 'आइन्स्टाईन चँलेज' (Einstein Challenge) बाबत उल्लेख केला. जेणेकरुन  महात्मा गांधी यांचे विचार, कार्य आणि आदर्श सध्याच्या आणि यापुढच्या पिढीला न्याव्याने माहिती व्हावे. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइंस्टीन ( Albert Einstein) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या विचारांचा दाखला देत पंतप्रधान मोदी यांनी जगभरातील बुद्धीवाद्यांना 'आइन्स्टाईन चँलेज' दिले आहे.

जगभरातील शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत आणि बुद्धीजीवी वर्गाने महात्मा गांधी यांचे विचार पुढे नेण्यासाठी आणी जगभरात पसरविण्यासाठी पुढे आले पाहिजे. म्हणूनच मी या वर्गाला 'आइन्स्टाईन चँलेज' देत असल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे.लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, 'मूठभर मिठाच्या जोरावर इतके प्रचंड आंदोलन उभे करण्याची ताकद केवळ महात्मा गांधी यांच्यातच होती. स्वातंत्र्य चळवळीत अनेक संघर्ष, आंदोलने झाली. पण, बापूंचा संघर्ष सर्वात वेगळा आणि मोठा होता. गांधींचा जन्म भलेही भारतात झाला. परंतू, त्यांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण जगतावर पडला. आजही त्यांच्या विचारांचा प्रभाव दिसतो.'

दरम्यान, याच लेखात पंतप्रधानांनी मार्टिन लूथर किंग यांचाही उल्लेख करत त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत उच्चारलेल्या शब्दांचा दाखला दिला आहे. मार्टिन लूथर किंग यांनी म्हटले होते की, 'इतर देशांमध्ये मी एक पर्यटक म्हणून जातो. भारतात मी एक तीर्थयात्री म्हणून येतो.' या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आणि जगाला महात्मा गांधी यांची का गरज आहे याबाबतही सांगितले आहे. (हेही वाचा, Mahatma Gandhi Jayanti 2019 Quotes: महात्मा गांधी यांचे आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणारे '5 प्रेरणादायी विचार')

मोदी पुढे लिहितात, 'महात्मा गांधी यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे, समस्येचे निरसन करण्याची क्षमता होती. आम्हाला मार्ग दाखविण्यासाठी महात्मा गांधी एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहेत. मानवता, विकास असो की आर्थिक आत्मनिर्भरता, महात्मा गांधी यांच्याजवळ प्रत्येक गोष्टीचे उत्तर होते. भारत गांधीजींच्या स्वप्नांना साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.' 'स्वत:सोबत जगाला समृद्ध बनवविण्यासाठी, तिरस्कार, हिंसा आणि दु:ख यांपासून मूक्त करण्यासाठी चला खांद्याला खांदा लाऊन काम करुया' असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.