Rohit Sharma (Photo Credit - X)

IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या बॅटने अपेक्षेनुसार कामगिरी केलेली नाही. रोहित सीएसकेविरुद्धही अपयशी ठरला, तर 29 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध हिटमॅनची बॅटही चालली नाही. आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहितच्या खराब फलंदाजीवर निशाणा साधला आहे. त्याने हिटमनच्या फिटनेसवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. (हे देखील वाचा: Delhi Beat Hyderabad, IPL 2025 10th Match Scorecard: दिल्लीने हैदराबादचा केला पराभव, 7 गडी राखून जिंकला सामना; स्टार्कनंतर फाफ डु प्लेसिस चमकला)

रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित

संजय मांजरेकर यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की रोहित शर्मा निश्चितच एका टप्प्यातून जात आहे. तो तीन-चार वर्षांपूर्वीचा रोहित शर्मा नाहीये. तो त्याच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे जिथे त्याला दररोज सकाळी पुढे जाण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते. मांजरेकरच्या मते, रोहितला आता खूप मेहनत घ्यावी लागेल. कारण आता बऱ्याच गोष्टी हाताबाहेर जात आहेत. रोहित सध्या त्याच्या प्रतिभेवर विश्वास ठेवत आहे.

दोन्ही सामन्यात फ्लाॅप

रोहितबद्दल बोलायचे झाले तर, तो सीएसके विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4 चेंडूत शून्य धावा काढून खलील अहमदचा बळी ठरला. तर दुसऱ्या सामन्यात रोहितच्या बॅटमधून 8 धावा आल्या. त्याला मोहम्मद सिराजने क्लीन बोल्ड केले.

मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीवरही केले भाष्य

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मध्ये खेळलेले त्यांचे पहिले 2 सामने गमावले आहेत. मुंबईबद्दल बोलताना मांजरेकर म्हणाले की, रायन रिकेल्टनन हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. या बाबतीत, त्याला भारतीय खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागेल. एबी डिव्हिलियर्स आणि हेनरिक क्लासेन यांच्याव्यतिरिक्त, भारतीय खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करणारे फार कमी आफ्रिकन फलंदाज आहेत. म्हणून रिकेल्टनला वेळ देण्याची गरज आहे. मुंबईकडे सूर्यकुमार यादव, रॉबिन मिंज, तिलक वर्मा असे खेळाडू आहेत, जे फलंदाजी लाइनअपला बळकटी देतात.