Firozabad Court News: तारुण उत्साही असतं. तो उत्साह चांगल्या कामासाठी, चांगल्या मार्गासाठी वापरला तर वाढत्या वयात त्या कामाचा, मार्गाचा त्रास होत नाही. मात्र, जर तारुण्य चुकीच्या गोष्टींसाठी वापरले असेल तर मात्र आज ना उद्या त्याची फळे, शिक्षा भोगावीच लागतात. खास करुन तुमचे प्रकरण जर पोलिसांकडे नोंद असेल आणि ते कोर्टात पोहोचले असेल तर काहीसे अधिकच. फिरोदाबाद येथील एका 80 वर्षीय वृद्ध गृहस्थाला याची प्रचिती आली आहे. जे आताच्या तरुण पिढीसाठीही मार्गदर्शनक ठरु शकते. या व्यक्तीला त्याने तरुणपात केलेल्या एका हत्या प्रकरणात कोर्टाने चक्क जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonmen) ठोठावली आहे. इतके दीर्घ आयुष्य मनासारखे जगल्यानंतर तारुण्यातील चुकीमुळे म्हातारपणी जर तुरुंगाची हवा खावी लागत असेल तर त्या व्यक्तीचे काय झाले असेल याची आपण कल्पना करु शकता. काय आहे प्रकरण घ्या जाणून.
फिरोदाबाद कोर्टाने एका खटल्यात 80 वर्षीय व्यक्तीला जन्मठेप आणि 20,000 रुपये आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सरकारी वकील नारायण सक्सेना यांनी अधिक माहिती देताना प्रसारमाध्यमांना सांगितले की, स्थानिक महिला मिरा देवा यांनी आरोपीने 14 सप्टेंबर 1974 रोजी पोलिसलांमध्ये तक्रार दिली होती की, महेंद्र सिंह याने तिच्या आईची गोळ्या घालून हत्या केली होती. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ठ होते. घटना घडली तेव्हा घटना घडलेले ठिकाणी नारकी हे आग्रा जिल्ह्यांतर्गत होते. मात्र पुढे हे ठिकाणी फरिदाबाद जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर खटला फिरोधाबाद कोर्टात हस्तांतरीत करण्यात आला होता.
वकील सक्सेना यांनी सांगितले की, सक्सेना पुढे म्हणाले की, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जितेंद्र गुप्ता यांनी गुरुवारी महेंद्रला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि दंड न भरल्यास दोषीला आणखी काही अतिरिक्त वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल, असे सांगितले.
दरम्यान, तुमचे पाऊल कायद्याच्या दृष्टीने एकदा का चुकीचे पडले आणि तुमच्या नावासमोर आरोपी हा शिक्का लागला तर तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागते. तिथे तुम्ही निर्दोष ठरला तर ठिक. नाहीतर तुम्हाला त्या प्रकणाची शिक्षा आज-ना उद्या भोगावीच लागते. जर तुम्ही जिवंत नसला तरच केवळ कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकता. अन्यथा कायदा तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहात नाही. भलेही त्यासाठी काही वेळ लागतो. मात्र, तुम्हाला शिक्षा मिळतेच, हे या प्रकरणाने दाखवून दिले आहे.