Gujarat Road Accident: गुजरातमधील जुनागढ (Junagadh) येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे रस्ता अपघातात (Accident) सात जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने एकाच कारमध्ये बसलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी दुसऱ्या कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांना या अपघातात जीव गमवावा लागला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या कारला धडकली. या धडकेनंतर दोन्ही कारचा चक्काचूर झाला.
प्राप्त माहितीनुसार, या कालावधीत पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जेतपूर-वेरावळ महामार्गावरील भांडुरी गावाजवळ सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन कारमध्ये धडक झाली. भांडुरीजवळील कृष्णा हॉटेलजवळ हा अपघात झाला. या अपघातात परीक्षेला जाणाऱ्या पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. (हेही वाचा -Maharashtra Road Accident: कंटेनर ट्रेलरवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात; हॉटेलसमोर पार्क केलेला वाहनावर आदळला कंटेनर, एकाचा मृत्यू (See Pics and Video))
दरम्यान, या अपघाताची एफएसएल पथकाकडून चौकशी करण्यात येणार आहे. या अपघातात ज्या पाच जणांना जीव गमवावा लागला ते विद्यार्थी होते. वीणू देवशी वाला, निकुल विक्रम कुवाडिया, रजनीकांत मुगरा, राजू कानजी, धरम विजय गोरे, अक्षर दवे, राजू कांजी भुतान अशी मृतांची नावे आहेत. (हेही वाचा -Truck Overturns At Kashimira: मीरा-भाईंदर येथील काशिमीरा परिसरात सिमेंट मिक्सर उलटला; ट्रक चालक ठार, 2 जखमी)
याआधी 19 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील भरूचमध्ये कार पार्क केलेल्या ट्रकला धडकल्याने भीषण रस्ता अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दोन मुले आणि दोन महिलांसह 6 जणांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, इको कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. भरूचमधील जंबुसर-आमोद रोडवर रात्री उशिरा हा अपघात झाला. ही टक्कर इतकी भीषण होती की, इको कारमधून प्रवास करणाऱ्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला होता.