Photo Credit- X

Maharashtra Road Accident: महाराष्ट्रातील खोपोली (Khopoli) येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती(Pune-Mumbai Expressway) मार्गाजवळील फूड कोर्टमध्ये हा अपघात घाला. अपघातात कंटेनर ट्रेलरने (Container Trailer) नियंत्रण गमावले तो पार्क केलेल्या वाहनांना धडकला. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याप्रमाणे ही घटना 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. फूड कोर्ट मॉलला धडकण्यापूर्वी ट्रेलरने अनेक वाहनांना धडक दिली, ज्यातून एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या प्रयत्नात तो माणूस अपयशी ठरला. यात त्याचा मृत्यू झाला.

कंटेनर ट्रेलरवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात