Truck Overturns At Kashimira (फोटो सौजन्य - X/@mid_day)

Truck Overturns At Kashimira: मीरा-भाईंदर (Mira-Bhayander) येथील काशिमीरा परिसरातील (Kashimira Area) हॉटेल अमर पॅलेसजवळ मोठा खड्डा पडल्याने बुधवारी सायंकाळी सिमेंट मिक्सरचा ट्रक मेट्रोच्या खांबांमधील खड्ड्यात पडला. या अपघातात (Accident) सिमेंट मिक्सर ट्रक चालक जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेनच्या सहाय्याने सिमेंट मिक्सरचा ट्रक काढण्यात आला.

काशिमीरा परिसरात सद्या मेट्रोचे काम सुरू असून, मेट्रोच्या खांबाखालील रस्ता अचानक खचल्याने मोठा खड्डा पडला. स्थानिकांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काशिमीरा पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. (हेही वाचा - Jammu Kashmir Road Accident: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये वाहन दरीत कोसळल्याने चार ठार; 14 जखमी)

दरम्यान, तेथील एका रहिवाशाने सांगितले की, आम्ही जे कुमार इन्फ्रा विरुद्ध काश्मिरा पोलिस स्टेशनमध्ये अनेक वेळा तक्रारी नोंदवल्या आहेत, परंतु अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. आता या अपघातामुळे मेट्रो विभागातील लोकांना त्रास होत आहे. हा संपूर्ण निष्काळजीपणा आहे. आम्ही उच्च न्यायालयात जाऊन त्यांच्याविरोधात याचिका दाखल करणार आहे. (हेही वाचा -Gondia Shivshahi Bus Accident: गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र व राज्य सरकारकडून मदत जाहीर; PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख)

मीरा-भाईंदर येथील काशिमीरा परिसरात सिमेंट मिक्सर उलटला, पहा व्हिडिओ - 

तथापी, अजून एका रहिवाशांनी सांगितले की, गेल्या 3 वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू आहे. मी येथे मोठ्या घटना घडताना पाहिल्या आहेत. आम्ही एमएमआरडीए, बीएमसीला लेखी पत्रे दिली आहेत, पण तोडगा निघाला नाही. रात्रीच्या वेळी मेट्रोचे काम कोणत्याही सुरक्षेशिवाय सुरू असते.