Jammu Kashmir Road Accident (फोटो सौजन्य - ANI)

Jammu Kashmir Road Accident: जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) मधील किश्तवाड (Kishtwar) मधील डांगदूर भागात (Dangdoor Area) बुधवारी संध्याकाळी एका निर्माणाधीन वीज प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे क्रूझर वाहन दरीत कोसळले. डछान (Dachhan) येथील ट्रीथल नाल्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident) झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर 14 जण जखमी झाले. आपत्कालीन सेवांनी जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. अधिकारी अपघाताच्या कारणाचा शोध घेत आहेत. तसेच जखमींना आवश्यक मदत करण्यात येत आहे. (हेही वाचा -Gondia Shivshahi Bus Accident: गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र व राज्य सरकारकडून मदत जाहीर; PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख)

किश्तवाडमध्ये वाहन दरीत कोसळल्याने चार ठार - 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात 14 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.