Fastag: आजपासून सर्व टोलनाक्यांवर वाहनांवर फास्टॅग असणे अनिवार्य करण्यात आले आहे. नव्या व्यवस्थेसह टोलनाक्यांवर पैसे घेणे बंद होणार आहे. तसेच फास्टॅग काढण्यासाठी येणाऱ्या समस्येवर सुद्धा एनएचआयने तोडगा काढला आहे. त्यामुळे जर एखाद्य वाहनावरील फास्टॅगचा रिजार्च संपला असल्यास तो त्याच्या माध्यमातून करता येणार आहे. फास्टॅगचे रिचार्ज अवघ्या तीन मिनिटांत तुम्हाला करता येणार आहे. परंतु जर तुमच्या वाहनावर फास्टॅग नसेल तर तुमच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाऊ शकतो.(LPG Cylinder Price: आजपासून गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ, गृहिणींचे बजेट कोलमडणार)
सर्व महामार्गांवरील टोलनाक्यांवर आजपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. परंतु याआधील फास्टॅग संदर्भात ग्राहकांना तो काढण्यासाठी किंवा रिचार्ज करण्यासाठी पुरेशी वेळ सुद्धा दिली गेली होती. पण आता नव्या व्यवस्थेमुळे टोल नाक्यांवर पैसे घेणे बंद होणार असल्याने फक्त फास्टॅग असलेल्या वाहनांनाच पुढे जाता येणार आहे.(Fastag: जाणून घ्या कसा कराल फास्टॅगचे रिचार्ज)
फास्टॅग म्हणजे काय?
फास्टॅग म्हणजे हा एक प्रकारचा टॅग असून जो वाहनांवर पुढील बाजूस लावला जातो. रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन किंवा RFID तंत्रज्ञनावर फास्टॅग काम करतो. तर टोल नाक्यांवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामधून स्टिकरचा बारकोड स्कॅन केला जातो आणि आपोआप टोलचे दर तुमच्याकडून स्विकारले जातात. हे पैसे फास्टॅग वॉलेटमधून कापून घेतले जातात. या फास्टॅगमुळे टोल नाक्यांवर वाहन चालकांना टोल देण्यासाठी थांबावे लागत नाही.
याआधी सुद्धा फास्टॅग सर्व वाहनांसाठी अनिवार्य केले होते. त्यानंतर आता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टॅग संदर्भातील नियमात काही बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार देशभरातील वाहनांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा त्यांनी फिटनेस सर्टिफिकेट जारी करण्यासाठी गाडीवर लावण्यात आलेल्या फास्टॅगची माहिती द्यावी लागणार आहे.