देशभरातील टोलवसूली प्रक्रिया उद्या म्हणजेच 15 फेब्रुवारीपासून बदलते आहे. उद्यापासून देशभरातील रस्त्यांवर फास्टॅग (FASTag) अनिवर्य (FASTag to Get Mandatory From February 15) असणार आहे. त्यामुळे नव्या व्यवस्थेनुसार देशभरातील सर्व टोलनाक्यांवर रोख पैसे घेणे बंद होणार आहे. त्यामुळे टोल नाक्यांवर सर्व प्रकारचे कर हे फास्टॅगद्वारेच घेतले जाणार आहेत. फास्टॅग रिचार्ज (Fastag Recharge) करण्यात येणारे अडथळे एनएचआयने दूर केले आहेत. जर एखाद्या वाहनाला फास्टॅग अकाऊंड रिचार्ज नसतील तर वाहन चालक टोल नाक्यांवर ते रिचार्ज करु शकतो. रिचार्च तीन मिनिटांत होईल असे एनएचआयने म्हटले आहे.
काय आहे फास्टॅग
फास्टॅग हा एक प्रकारचा चॅग स्टीकर आहे. जो वाहनांच्या विंडोस्क्रीनवर लावण्यात येतो. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन किंवा RFID तंत्रज्ञानावर फास्टॅग काम करतो. त्यामुळे टोल प्लाजा वर लावलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बार-कोड स्कॅन केला जातो. जेणेकरुन टोल स्वयंचलीतपणे कर भरणा केला जातो. फास्टॅगमुळे टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी लागणाऱ्या रांगा कमी होता. खूप वेळ रांगेत उभे राहावे लागत नाही.
फास्टॅग असा करा खरेदी
फास्टॅग ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करता येऊ शकतो. फास्टॅग कोणत्याही बँक, अॅमझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम यांसारख्या ई-कॉमर्ट प्लॅटफॉर्मवरुन खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय 23 ऑथराईज्ड बँक, रोड ट्रान्सफोर्ट ऑफिस अशा विविध ठिकाणांहून फास्टॅग खरेदी करता येऊ शकता. पूर्ण देशभरात 30 हजार पॉइंड ऑफ सेल (PoS) वर फास्टॅग उपलब्ध आहे.
कुठे मिळवाल फास्टॅग परवाना
फास्टॅग खरेदी साठी चालकाचा परवाना आणि वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्रत जमा करावी लागते. बँक केवायसी साटी यूजर्सचे पॅनकार्ड आणि आधार कार्ड कॉपीही मागू शकतात. याशिवाय UPI/डेबिट /क्रेडिट कार्ड/NEFT/नेट बँकींग याच्या माध्यमातून रिचार्ज केला जाऊ शकतो.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने फास्टॅगची किंमत 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय 200 रुपये सिक्योरिटी डिपॉझिट द्यावे लागते. वेगवेगळ्या बँकांचे दर वेगवेगळे असू शकतात.