शेतकरी पुन्हा एकदा आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक (Farmers' Protest In Delhi) झाले आहेत. या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्ली शहरावर आज धडक मोर्चा (Farmers' Protest) काढण्याची घोषणा केली आहे. मोर्चास सुरुवात होत असून, त्याचा परिणाम शहरातील रहतदारीवर झाला आहे. दिल्ली आणि नोएडा (Delhi Noida Traffic Updates) या दोन शहरांना जोडणाऱ्या सीमा तुडूंब वाहतूक कोंडीने भरुन गेल्या आहेत. चिल्ला बॉर्डरही रहदारीने (Chilla Border Traffic) फुलून गेली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफीक जॅम झाले आहे.
रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा
शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आज (सोमवार, 2 डिसेंबर) पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढत आहेत. या मोर्चामध्ये जवळपास 20 जिल्ह्यांमधील शेतकरी सहभाही होणार आहेत. जे दुपारी 12.00 वाजणेच्या सुमारास शेतकरी मोर्चाच्या निश्चित ठिकाणावर पोहोचतील असे अपेक्षीत आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमे आणि वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार आणि दाखवलेल्या दृष्यांनुसार दिल्ली नोएडा बॉर्डर आणि चीला सीमेवर मोठ्या प्रमाणावर वाहूक कोंडी पाहायला मिळत आहे. अनेक किलोमीटर लांब रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. वाहतूक रहदारी व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलीस आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, नोएडा पोलिसांनी रविवारीच वाहतूक निर्बंध आणि वाहतूक बदलांबाबत सूचना जारी केल्या आहेत. (हेही वाचा, Kisan Andolan 2.0: शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या 65 वर्षीय शेतकऱ्याचा शंभू सीमेवर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू)
नोएडा पोलिसांनी सूचवलेले वाहतूक मार्गातील बदल
नोएडा पोलिसांनी रविवारी निर्बंध आणि वळवण्याच्या तपशीलवार वाहतूक सल्लाही जारी केला. तो खालील प्रमाणे:
चिल्ला बॉर्डर ते ग्रेटर नोएडा: सेक्टर 14-ए फ्लायओव्हर, गोलचक्कर चौक, संदीप पेपर मिल चौक, झुंझुपुरा चौक
DND बॉर्डर ते दिल्ली: फिल्मसिटी फ्लायओव्हर, सेक्टर-18, एलिव्हेटेड रोड
कालिंदी बॉर्डर ते दिल्ली: महामाया फ्लायओव्हर, सेक्टर-37
ग्रेटर नोएडा ते दिल्ली: चरखा फेरी, कालिंदी कुंज किंवा हाजीपूर अंडरपास मार्गे सेक्टर-५१ आणि मॉडेल टाऊन
यमुना एक्सप्रेसवे वाहतूक: जेवार टोलवरून बाहेर पडा, खुर्जा आणि जहांगीरपू मार्गे पुढे जा
पेरिफेरल एक्स्प्रेस वे ट्रॅफिक: सिरसा ऐवजी दादरी किंवा दसना एक्झिट वापरा.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
शेतकऱ्यांच्या पाच मागण्या आहेत. त्या खालील प्रमाणे:
- जुन्या संपादन कायद्यानुसार 10 टक्के भूखंड वाटप आणि 64.7 टक्के वाढीव मोबदला.
- 1 जानेवारी 2014 नंतर संपादित केलेल्या जमिनीवर बाजारभावाच्या चौपट मोबदला आणि 20 टक्के भूखंड देण्यात यावे.
- भूमिहीनांच्या मुलांना शेतकऱ्यांना रोजगार व पुनर्वसनाचा लाभ द्यावा.
- उच्चाधिकार समितीने पारित केलेल्या मुद्द्यांवर शासनाचे आदेश व योग्य तोडगा लोकसंख्या असलेल्या भागात केले पाहिजे..
#WATCH | Uttar Pradesh: Security heightened in Noida as farmers from Uttar Pradesh are on a march towards Delhi starting today. pic.twitter.com/X67KeeUDba
— ANI (@ANI) December 2, 2024
दरम्यान, शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. या आधीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढले आहेत. शेतकऱ्यांच्या मनात सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. असे असले तरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यावर शेतकरी भर देतात. या आधीही शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने शांततेच्या मार्गाने केली आहेत.