नागरिकांची होणारी फसवणूक यावर चाप बसण्यासाठी ईपीएफओ यांनी आपल्या EPF खाते, खासगी माहिती किंवा OTP संदर्भात फोन किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे. EPF बद्दल OTP च्या माध्यमातून फसवणूक किंवा अन्य मुद्द्यांवर होणारा वाढता धोका पाहता ईपीएफओ कडून फ्रॉडची नोटीस जाहीर केली आहे. त्यांनी असे म्हटले की, ईपीएफओ खातेधारकांनी आपला आधार कार्ड क्रमांक, पॅक क्रमांक, बँक खाते किंवा UAN क्रमांक सारखी खासगी माहिती व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यापासून दूर रहावे. असे केल्यास तुम्हाला तुमच्या पैशांबद्दलचा अधिक धोका संभवतो.
ईपीएफओने आपल्या अधिकृत ट्विटरवर एक ट्विट केले आहे. त्यामध्ये नागरिकांना आपला आधार, पॅन, UAN, बँक अकाउंट किंवा OTP सारखी खासगी माहिती फोन किंवा सोशल मीडियात शेअर करु नये असे स्पष्ट केले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, व्हॉट्सअॅप किंवा कोणत्याही अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही सर्विससाठी पैसे मागितले जात नाहीत. ईपीएफओ यांनी खासगी माहिती न देणे आणि ओटीपी शेअर करण्यासाठी कॉल किंवा टेक्स मेसेजला रिप्लाय करु नये, कारण यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.नागरिकांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in येथे भेट द्यावी.(PF Account Balance: पीएफ खात्यावरील व्याज तपासण्याची सोपी पद्धत, घ्या जाणून)
ईपीएफ खातेधारकांनी आपले कागदपत्र Digilocker येथे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करुन ठेवावे. डिजिलॉकर हे अॅप अॅन्ड्रॉइड आणि आयओएस ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. डिजिलॉकरचा वापर करण्यासाठी तुम्हाला प्रथम लॉग इन करावे लागणार आहे. ईपीएफओ सेवा जसे UAN कार्ड, PPOs आणि स्कीम सर्टिफिकेट्स सुद्धा डिजिलॉकरवर उपलब्ध आहे.